




✒️सातारा(पुरोगामी न्युज नेटवर्क)
सातारा(दि.२जानेवारी):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली धार्मिक मातृ संघटना भारतीय बौद्ध महासभा रजि.नं.3227/1955 पब्लिक ट्रस्ट नं. F-982(मुंबई) या धार्मिक संस्थेचीनूतन तालुका कार्यकारणी निवड भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रा अरुण पोळ सर यांचे प्रमुख उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्हा अध्यक्ष आयु अरुण भोसले सर यांचे मार्गदर्शनाखाली व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे साहेब , डॉ संपत नाना कांबळे , विकास तात्या जाधव , प्रवीण कांबळे यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मेढा येथे करण्यात येणार असून धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जावली तालुक्यातील तमाम बौद्ध उपासक व उपासिका यांनी उपस्थित रहावे.
असे आवाहन आंबेडकरी चळवळीच्या वतीने आयु.दशरथ कांबळे(अध्यक्ष( बौद्धाचार्य ), आयु.वसंतराव चव्हाण गुरुजी (बौद्धाचार्य), आयु.दत्तात्रय जाधव गुरुजी (बौद्धाचार्य ), आयु.अनिल शिंदे (बौद्धाचार्य ),आयु.राहुल रोकडे (बौद्धाचार्य) आयु.चंद्रकांत जाधव, (बौद्धाचार्य )आयु.संतोष चव्हाण (सचिव) व इतर सर्व भारतीय बौद्ध महासभा , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , समता सैनिक दल जावली तालुका कार्यकारणी यांचे वतीने करण्यात येत आहे .




