Home महाराष्ट्र आदर्श व्यक्तिमत्व श्री पुष्पाकरजी बांगरे सर सेवानिवृत्त

आदर्श व्यक्तिमत्व श्री पुष्पाकरजी बांगरे सर सेवानिवृत्त

269

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.3फेब्रुवारी) :-महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे आधारस्तंभ तथा सभासदांच्या सहकार्याने एका छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करणारे संघटनेच्या अस्मितेसाठी सतत झटणारे ब्रह्मपुरी पुरोगामीची आन, बान,शान व शिक्षकांचा अभिमान असणारे पुष्पाकर बांगरे सर वयाची 58 वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त झाले.

संघटना पदाधिकारी कसा असावा, सामान्य सभासदांशी नाळ कशी जोडून ठेवावी, समस्या निवारण सभेत आक्रमक भूमिका कशी घ्यावी, हे स्वतःच्या अभ्यासपूर्ण तथा धैर्याने व संघटन निष्ठेने काम करणारे पुष्पाकर बांगरे सर पुरोगामी संघटनेचा तेजोमय ध्रुवतारा त्यांनी केलेले कार्य त्यांनी दिलेली शिकवण, संघटना वाढीसाठी काय करायला हवे व काय करायला नको हे निर्विवाद सत्य सांगणारे अधिकारी वर्ग शिक्षकांना जर न्याय देत नसतील तर कोणते मंत्र म्हणायचे व कोणते ब्रम्हास्त्र सोडायचे याचा पुरेपूर ज्ञान त्यांनी आपल्या नवीन पिढीला दिले पुष्पाकरजी बांगरे सर यांचे मार्गदर्शन रुपी उपदेश मात्र बरीच वर्ष सर्वांच्या कायम स्मरणात राहणार असे त्यांना अनुभवलेले प्रत्येक व्यक्तिमत्व आवर्जून सांगत आहे.

संघटनेमध्ये पदाधिकारी येतात व जातात.पण काही पदाधिकारी असे असतात की, ज्यांचे अस्तित्व हे चिरकाल सामान्य सभासदांच्या मनात घर करून राहतं. ज्यांचं नाव घेताना मनात आदराची भावना निर्माण होते. यांच्या बद्दल कितीही लिहीलं तरी ते तोकडेच पडणार आहे.या संघटनेच्या तपस्वीस श्री प्रमोदजी बांगरे यांनी सुद्धा सेवानिवृत्ती पर शुभेच्छा दिल्या तर त्यांचा पुढील भावी आयुष्य सुखमय,समाधानी व निरोगी जावो ही सर्व संबंधितांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here