Home महाराष्ट्र पंचाहत्तर करोड सूर्यनमस्कार महायज्ञ मोहिमेत पिपरी येथील ग्रामस्थ सहभागी

पंचाहत्तर करोड सूर्यनमस्कार महायज्ञ मोहिमेत पिपरी येथील ग्रामस्थ सहभागी

262

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

झरीजमनी(दि.2फेब्रुवारी):-75 व्या आजादीच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 करोड सूर्यनमस्कार करण्याचा देश वाशियांचा संकल्प राष्ट्रीय मंच्यावर करण्यात आला आहे. भारत देशाच्या अमृत महोत्सवाच्या अभियानात सहभागी होऊन सूर्यनमस्कार व योग करून आपण निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मोहिमेत सर्व देश वाशियांनी सहभाग घ्यावा. यासाठी आज केळापूर तालुक्यातील पिपरी रोड येथे 75 करोड सूर्यनमस्कार मोहिमेत कार्यक्रमाचे प्रमुख हिंदी विकास शाळेचे सचिव आनंदजी वैद्य व भोई समाज युवा मंच यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रदिप नागोराव भनारकर यांनी सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शक विनोदजी पेरकावार आणि रमेश सिंगमशेट्टीवार हे होते. तर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते यशवंतजी काळे यांनी केले. कार्यक्रमात राहुल गेडाम, आर्यन खांडरे, दुर्गेश बोरसरे,चैतन्य ठाकरे, प्रलय शेंदरे, कार्तिक नैताम, समर्थ आत्राम, संतोष हामंद, संजय बोरसरे, अशोक बोरसरे, श्रावण, संजय हामंद, महेंद्र मोकासे, रामआदे, विष्णू आत्राम, भास्कर कोरवते, प्रणय शेंदरे, पांडुरंग देवजळे, मारोती कानकाटे यांच्या सहभागाणे कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद वैद्य व विनोद पेरकावार यांनी केले. तर आभार प्रदर्शन यशवंत काळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here