




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.1फेब्रुवारी):-अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप सन 2021-22 चे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया महा डीबीबीटी पोर्टलवर सुरू असून नवीन अर्ज व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यास 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन ट्विटद्वारे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ना. मुंडेंकडे सामाजिक न्याय मंत्र्याचं खातं आल्यापासून त्यांनी या खात्याअंतर्गत येणार्या प्रत्येक योजनांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न करत खात्याअंतर्गत येणार्या योजना सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसापर्यंत कशा पोहचतील, त्यांना त्याचा लाभ कसा घेता येईल यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात.
सजग आणि सतर्क रहात वेळोवेळी पालकमंत्र्यांकडून योजनांची माहिती स्वत:च्या फेसबुक, ट्विटर हँडलद्वारे दिली जाते. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशीपचे अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढल्याची माहिती ना. मुंडेंनी ट्विटरद्वारे देऊन अर्ज करण्याबाबत आवाहन केले आहे.आपल्या आवाहनात त्यांनी म्हटले आहे, सन 2021-22 चे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया महा डीबीबीटी पोर्टलवर सुरू आहे. नवीन अर्ज व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यास फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.




