Home महाराष्ट्र लोकप्रिय आमदार तथा कोरोना योद्धा-सुरेशरावजी धस

लोकप्रिय आमदार तथा कोरोना योद्धा-सुरेशरावजी धस

280

बीड, लातूर, उस्मानाबाद विधान परिषद मतदार संघाचे लोकप्रिय आमदार नव्हे नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा आ.सुरेशरावजी धस आण्णा यांचा दिनांक २ फेब्रुवारी २०२२ रोजी ५१ वा वाढदिवस साजरा होत आहे. आगळ्या – वेगळ्या वाढदिवसाचे आकर्षण ठरलेले म्हणजे त्यांनी यापूर्वीच्या वाढदिवसानिमित्त कसल्याही प्रकारचे पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाल, श्रीफळ न स्विकारता ” बुके नव्हे बुक ” स्विकारुन आपला वाढदिवस साजरा केलेला आहे. अशा आगळा – वेगळा वाढदिवस साजरा करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव नेते असतील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे. हे आपण सर्वच जाणतो. परंतु आजच्या तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी मागील वाढदिवस प्रेरणादायी ठरलेला आहे. आजच्या युगातील तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि पर्यायाने त्याचा उत्तम युवापिढी घडण्यासाठी उपयोग होईल. आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढते आहे. वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे. असे सुरेश आण्णा नेहमीच सांगत असतात.त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला लेख…..संपादक

दीन-दुबळ्यांचा, गोरगरिबांचा भक्कम आधारवड… क्षितिजाला कवेत घेणारा कोरोना योद्धा आ.सुरेश रामचंद्र धस. विकासाच्या रंगांनी ज्यांनी सर्वसामान्य जनतेचं अंगण सजवलं, गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं अशा आपल्या मनातील… मातीतील.. सर्वसामान्यां नेता… अडीअडचणीच्या,दुःखद प्रसंगांमध्ये अर्ध्या रात्री धावून येणारा वाघाच्या काळजाचा पाठीराखा…आ.सुरेश रामचंद्र धस.
मातीशी नातं जोडणारा आणि माणुसकी जपणारा हा नेता आपल्या कौशल्याने कार्यकर्तृत्वाने यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे. आपल्या सत्कार्याच्या माध्यमातून ज्यांनी सभोवतालच्या जीवनात सातत्याने आनंददायी उत्साहाची पेरणी केली आणि येणाऱ्या पिढीला दिशा दिली. ज्यांनी इतरांच्या दुःखात कधी मदतीचा हात दिला तर कधी पाठीवर सहानुभूतीची थाप दिली अशा समाजमान्य लोकनेते रामचंद्र धस दादांच्या तालमीत वाढलेले, घडलेले सुरेश आण्णा. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची धमक त्याच्या उरामध्ये असते आणि याच भावनेने अण्णांनी अगदी बालवयातच आपण समाजासाठी काहीतरी करायचे या भावनेने जो निश्चय केला तेव्हापासून पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. अनेकविध नैसर्गिक आपत्तीमध्ये संकटाशी दोन हात करण्यास अण्णा कधी मागे हटले नाहीत. कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या कालावधीत सर्व जनता मेटाकुटीला आली असता प्रत्येकाची वेगवेगळी अडचण सोडवण्यासाठी २४ तास उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी म्हणजे सुरेश आण्णा धस होय.

कोरोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला चिंतेचे वातावरण आहे. आपण घरात सुरक्षित राहू, असा विचार काही जणांनी केला आहे. तर काही जणांनी या संकटकाळात लोकांची सेवा करायचे ठरवले आणि त्या व्यक्ती पुढेही आल्या आहेत. भारतामध्ये अशा व्यक्तींना कोरोना योद्धा असे म्हटले जाते. सर्व जग कोरोना विषाणू विरोधात लढत आहे. प्रत्येकालाच स्वतःची व कुटुंबाची काळजी वाटत आहे. त्यातही आरोग्य, पोलिस, मनपा कर्मचारी हे कोरोना योद्धे निस्वार्थपणे लढा देत आहे. या योद्ध्यांची काळजी घेणारे योद्धेही पडद्या मागून सेवा देत आहेत. महामारीचे संकट ज्यावेळी अवघ्या देशावर ओढावले होते, त्याचवेळी आष्टी मतदार संघात कोरोना हातपाय पसरत होता. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसमोर जाऊन सार्‍यांना विश्वासात घेण्याची जबाबदारी ओळखत आ.सुरेश धस यांनी मदतकार्याचा धडाका लावला. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या वाटपावर भर न देता, ते खरोखरी एक ‘कोविड योद्धे’ म्हणून कित्येकांच्या मदतीला धावून गेले.
‘सेवा परमो धर्मः, “जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हा आयुष्याचा संकल्प मानून राजकारणातही १०० टक्के समाजकारण करणारे सेवाव्रती म्हणजे आ.सुरेश धस. कोरोनाकाळात कोरोनाच्या भीतीने भलेभले घरी बसले. या काळात कोरोनामुळे रंजलेल्या गांजलेल्यांची दिवसरात्र सेवा करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ.सुरेश धस यांनी मेहनत आणि समाजनिष्ठेची पराकाष्ठा केली. त्यांनी गरजूंच्या मदतीसाठी कधीही राजकारण केले नाही.

त्यामुळे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व आ.धस यांची प्रतिमा जनमानसावर कोरली गेली. जनतेच्या लहानमोठ्या प्रश्नांकडे बारकाईने लक्ष देणारे लोकनेते आ.सुरेश धस कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. लोकांवर आलेले कोणतेही संकट असो ते आपले आहे, असे मानून सढळ हस्ते समाजाचे देणेदार लागतो, या भावनेतून आमदार, सुरेश धस यांनी काम केले. त्यांनी लहानपणापासून खूप काबाडकष्ट केले. कष्टाने आर्थिक सुबत्ता आली असली तरी ते दिवस विसरायचे नाही, हे ध्येय मनात कायम ठेवले. त्यांनी व्यवसायात नफा कमाविला, पण, ते माझे नाही, त्यात समाजाचाही वाटा आहे, असे मानून समाजासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला. पक्षविरहित काम करणे हा आपला आत्मा असल्यानेच कार्य करण्याची ऊर्जा मिळते. गेली अनेक वर्षे जनतेच्या लहान – मोठ्या प्रश्नांकडे बारकाईने आणि जातीने लक्ष देणारे लोकनेते आ.सुरेश धस या जागतिक संकटातही गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेकांची उपजीविका अडचणीत आली. अशा वेळी आ.धस यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेकडो नागरिकांना अन्नधान्याचे घरपोच वाटप केले. त्याचबरोबरीने मोलमजुरी, तसेच हातावर पोट असलेल्या गरजूंना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. सर्वसामान्यांची कोरोनासंबंधित हर एक गरज भागविण्याचा प्रयत्न अव्याहतपणे सुरू आहे. कुणीही गरजू लोकनेते आ.सुरेश धस यांच्या समोरून रिक्त हस्ते परतत नाही. कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटकाळातही आ.सुरेश धस शक्य तितक्या अधिकाधिक लोकांपर्यंत सर्व प्रकारची मदत पोहोचविण्याचा प्रयास करीत आहेत. आ.धस हे एखाद्या आधारवडासारखे जनतेच्या पाठीशी उभे आहेत. अशा या लोकप्रिय समाजसेवकाच्या कार्याला मनापासून सलाम.तसेच वाढदिवसानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा….!!!

✒️राजेंद्र लाड(आष्टी,जि.बीड)मो:-९४२३१७०८८५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here