Home गडचिरोली देशाची संपत्ती मोठ्या उद्योग पतीच्या घशात घालणारा अर्थसंकल्प – महेंद्र ब्राम्हणवाडे

देशाची संपत्ती मोठ्या उद्योग पतीच्या घशात घालणारा अर्थसंकल्प – महेंद्र ब्राम्हणवाडे

83

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.1फेब्रुवारी):- देशात महागाई ने आभाळ टेकले असतांना सोबतच अवकाळी पाऊस, कोरोना महामारी या सर्व घटनांनी शेतकरी, सर्व सामान्य जनता व लघु व्यापाऱ्याचे कंबरडे मोडले आहेत. देशात बेरोजगारीचे दर उच्चांक गाठले आहे. अशा परिस्थितीत देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना या अर्थसंकल्पात सामान्य वर्गाला मोठी अपेक्षा होती. मात्र हे अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांसाठी फक्त घोषणांचे बजेट ठरले असून देशाची संपत्ती मोठ्या उद्योग पतीच्या घशात टाकण्याचे काम केंद्रातील सरकार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करु पाहत आहे.

सबका साथ सबका विकास या फक्त घोषणाच असून त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसत नाही. अमृत महोत्सववी वर्षात देशातील जनतेला अमृताचा अनुभव मिळेल असे बोलले जात होते. पण देशाची सद्याची आर्थिक स्थिती, सरकारने सादर केलेले आकडे, महागाई आणि सरकारे देशाची संपत्ती विकण्याचा लावलेला सपाटा पाहता देश प्रगती कडून अधोगतिकडे जात असल्याचे दिसते. अर्थसंकल्पात नवीन काही नसून, फक्त शेतकरी कष्टकरी, लघु व्यापाऱ्यांना, बेरोजगार युवकांना निराशेत ठेवण्याचा काम केंद्रातील सरकारने केला आहे.

Previous articleवाघाच्या हल्ल्यातील मृतकाच्या नातेवाईकास 5 लाखाचा सानुग्रह निधि वाटप
Next articleलोकप्रिय आमदार तथा कोरोना योद्धा-सुरेशरावजी धस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here