Home महाराष्ट्र वाघाच्या हल्ल्यातील मृतकाच्या नातेवाईकास 5 लाखाचा सानुग्रह निधि वाटप

वाघाच्या हल्ल्यातील मृतकाच्या नातेवाईकास 5 लाखाचा सानुग्रह निधि वाटप

210

🔸सोनेगांव बेगड़े येथील वाघ हल्ला प्रकरण

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.1फेब्रुवारी):-चिमुर परिसरातील सोनेगांव बेगड़े येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाच्या नातेवाईकास 5 लाख रूप्याचा धनादेश सानुग्रह निधि वनविभाग चिमुर तर्फे देण्यात आला.

17 डिसम्बर 2021 रोजी चिमुर परिसरातील सोनेगांव बेगड़े येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या देवीदास महादेव गायकवाड़ वय 40 वर्ष यांचे वारस त्यांची आई लक्ष्मीबाई महादेव गायकवाड़ याणा दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी सानुग्रह निधी 5 लाख रूप्याचा धनादेश चिमुर प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी यू एस नैताम, ट्री फाउंडेशन चिमुरचे अध्यक्ष मनीष नाईक यांचे हस्ते देण्यात आला, यावेळी क्षेत्र सहाय्यक रमेश नरड़, वनरक्षक ए,एस मेश्राम, आर डी नैताम, के,डी, गायकवाड़, पोतराजे, सहारे उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here