Home महाराष्ट्र वरुड तालुक्यात आमदार चषक चित्रकला स्पर्धा संपन्न !

वरुड तालुक्यात आमदार चषक चित्रकला स्पर्धा संपन्न !

313

🔸१५०३ विद्यार्थ्यांनी घेतला स्पर्धेत सहभाग !

✒️वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरुड(दि.1फेब्रुवारी):-मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या आवडीचे पण अभ्यासा व्यतिरिक्त उपक्रम राबवावा या उद्देशाने मुलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवारातर्फे आमदार चषक चित्रकला’ स्पर्धा हा उपक्रम घेण्यात आला. यात चित्रकला स्पर्धेमध्ये १५०३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.चित्रकला स्पर्धेचे आयोजन मतदारसंघातील वरुड तालुक्यातील सर्व शाळांमध्ये आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवारातर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मतदार संघातील शाळांनी सहभाग घेतला असून या चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम बक्षिस पाच हजार रुपये, द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये, तृतीय बक्षीस दोन हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांनी सकाळच्या दरम्यान ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट इन्ग्लिश शाळांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेला भेट दिली व प्रत्यक्ष स्पर्धेची पाहणी केली त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद बाळू पाटील जिल्हा उपाध्यक्ष समीर अली, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी शहराध्यक्ष स्वप्नील आजनकर, स्पर्धा प्रमुख कला शिक्षक वसीम शेख, यांच्यासह कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती .सदरील चित्रकला स्पर्धेमध्ये कोरोना काळात रुग्णांची मदत करताना आमदार देवेंद्र भुयार, मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवितांना आमदार देवेंद्र भुयार, विधानभवन येथे मतदारसंघातील समस्या मांडतांना आमदार देवेंद्र भुयार, हे तीन विषय विषय ठेवण्यात आले होते. सदरील सर्व चित्रकला स्पर्धा आहे स्पर्धकांसाठी निःशुल्क ठेवण्याचे आली असून आयोजकांकडून त्यांना ड्रॉईंग सीट पुरवण्यात आल्या या सापर्धेमध्ये वरुड तालुक्यातील २८ शाळेतील १५०३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

“आमदार चषक चित्रकला” २०२२ स्पर्धेला मुलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला, बरेच विद्यार्थी आम्हाला स्वतः फोन कॉल करून विचारात होते की आम्ही पण यात सहभागी होऊ का, त्यांना हो म्हटल्यावर त्यांनी आवडीने चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आणि १५०३ विद्यार्थी आवडीने पेन्सिल पेन हातात घेऊन चित्र काढत होते. या उपक्रमास विध्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असे वसिम शेख यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here