



✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.1फेब्रुवारी):- भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांचे कार्य कर्तव्याची आज पर्यंत स्मारक रूपाने मुंबई शहरांमध्ये दखल घेण्यात आली नाही ही खेद जनक बाब आहे.रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा आदर्श घेवून कामगार व कामगार चळवळीचे नेते भावीपिढीला दिशा देतील यासाठीं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हुतात्म्या बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीड़ा भवन सेनापती बापट मार्ग मुंबई येथील आवारात नारायण मेघाजी लोखंडे यांचा पुतळा बसविण्यात यावा.
यासाठी नारायण मेघाजी लोखंडे स्मृती विचार मंच या संस्थेचे अध्यक्ष श्री सुदाम गाडेकर गुणवंत कामगार पुरस्कार सन्मानित यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त मा श्री रवीराज इळवे यांना त्याच्या कार्यालयात भेटून निवेदन देण्यात आले यावेळीं नारायण मेघाजी लोखंडे यांचे पणतू गोपीनाथ लोखंडे यांनी राजाराम सूर्यवंशी लिखित रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांचे चरित्र स्नेहपूर्वक सप्रेम भेट देण्यांत आले, यावेळीं संस्थेचे सेक्रटरी जगन्नाथ कुदळे,, प्रमुख सल्लागारा नवनीत सिनलकर दत्तात्रय माऴी, सचीन नागवेकर इ मान्यवर उपस्थितित होते.


