




🔸कांग्रेसचे मिडीया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी घेतली दखल
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.1फेब्रुवारी):-कोरोना तिसऱ्या लाटेच्या संदर्भात शासनाने कडक निर्बध लादून मा.उपविभागीय अधिकारी चिमुर यांनी सर्व व्यापारी मंडळ यांचेशी चर्चा करून आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेत अंमलबजावणी केली असल्याने आठवडी बाजार बंद करण्यात आले आहे.परंतु यावर कोणत्याही प्रकारची दखल न घेता आठवडी बाजार कमी जास्त सुरू आहे. आणि कोरोना रुग्ण मुक्त होण्याचा दर वाढला असून भीतीदायक वातावरण नसल्याने चिमूर सह तालुक्यातील आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी कांग्रेसचे चिमूर शहर मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केली आहे.
शासनाचे कडक निर्बंध असले तरी मात्र गर्दी होत होती. शंकरपट,नाटक व इतर कार्यक्रम सुद्धा धुमधडाक्यात सुरू आहे. चालू कोरोना रुग्ण वाढ व कोरोनामुक्त वाढ यातील तफावत व वातावरण पाहून शासनाने निर्बध शिथिल केले असल्याने तालुका प्रशासनाने चिमूर सह तालुक्यातील आठवडी बाजार सुरू करावे जेणेकरून छोट्या दुकानदार याचे उत्पन्न वाढून ग्राहकांना त्रास होणार नाही.याची दखल आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी कांग्रेसचे चिमूर शहर मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केली आहे. करीता चिमुर सह तालुक्यातील संपूर्ण आठवडी बाजार सुरू करण्याची परवानगी देण्यात यावे




