Home Education समतादुतांच्या प्रयत्नातून उच्च शिक्षणासाठी कु. प्रतीक्षा वाघमारे पोहचली थेट रशियात

समतादुतांच्या प्रयत्नातून उच्च शिक्षणासाठी कु. प्रतीक्षा वाघमारे पोहचली थेट रशियात

222

✒️वसमत(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वसमत(दि.1फेब्रुवारी):-समाजातील अनुसूचित जाती, मागासवर्गीय वंचित घटकांच्या विकासासाठी प्रबोधनासवे त्यांच्यापर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती पोहचवण्यासाठी समाजकल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे व बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली समतादूत नेहमीच कृतियुक्तपणे प्रयत्नशील असतात.

याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे :पोटा या छोट्याशा गावातील अनुसूचित जातीतील विद्यार्थिनी कु.प्रतीक्षा वाघमारे ही बार्टी चे समतादूत मिलिंद आळणे , गुरुनाथ गाडेकर यांच्या माहिती मार्गदर्शन प्रयत्नातून आज दिनांक :31 जानेवारी रोजी थेट वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी भरारी घेत रशियात मेडिकल (एम.बी.बी.एस.)साठी पोहचली. असून परिसरातील सर्व ग्रामस्थ तिचे अभिनंदन करीत आहेत. व बार्टी समतादूतांच्या स्तुत्यपूर्ण कार्याचा आनंद व्यक्त करीत आहेत .समतादूतांच्या या उल्लेखनीय सत्कर्माबद्दल बार्टीचे समतादूत अशोक इंगोले, सुरेश पठाडे, शंकर पोघे, सुकेश कांबळे,सुनीता आवटे, संगीता खांदळे, गजानन अंभोरे,प्रफूल पटेबहादूर आदींच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here