Home Education शाळा तिथे संगीत शिक्षकांची नियुक्ती करा…

शाळा तिथे संगीत शिक्षकांची नियुक्ती करा…

268

🔹गडचिरोली जिल्हा संगीत शिक्षक संघटना मार्फत निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.1फेब्रुवारी):-गडचिरोली जिल्हा संगीत शिक्षक संघटना मार्फत आज दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी गडचिरोली जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मान. श्री आर पी निकम यांना संचमान्यतेमध्ये संगीत शिक्षकाचे स्वतंत्र पदनिर्मिती करून गडचिरोली जिल्ह्यात शाळा तिथे संगीत शिक्षक याप्रमाणे संगीत शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी या अनुषंगाने निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मान. श्री निकम यांच्याशी साधक चर्चा झाली त्यावेळी त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये संगीत शिक्षकाची पदाची आवश्यकता लक्षात घेत शासन दरबारी पाठपुरावा करून संगीत शिक्षक पदाची भरती करण्याची मागणी जरुर करू अशी ग्वाही दिली.

त्यावेळी गडचिरोली जिल्हा संगीत शिक्षक संघटना चे अध्यक्ष श्री धनपाल कार, सचिव श्री राहुल आंबोरकर, कार्याध्यक्ष श्री संजय धात्रक, सर्व सदस्य श्री जयप्रकाश बावनथडे, श्री राहुल सपाटे, श्री भारत राजगडे इत्यादी उपस्थित होते.संघटनेत सहभागी होण्या करिता व संघटनेच्या बळकटी करीता सचिव ह्यांनी जिल्ह्यातील सर्व संगीत पदवीधर व संगीत शिक्षक ह्यांना संघटनेत जुळण्याचे आवाहन केले आहे. संपर्काकरिता 9730864143 हे नंबर दिले आहे.

Previous articleडॉ.बाबासाहेब आंबेडकारांची पत्रकारीता व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव परिसंवाद संपन्न
Next articleसमतादुतांच्या प्रयत्नातून उच्च शिक्षणासाठी कु. प्रतीक्षा वाघमारे पोहचली थेट रशियात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here