Home बीड निराधार योजनेतील लाभार्थ्यांना विजयसिंह पंडित यांच्याहस्ते मंजुरीपत्राचे वाटप

निराधार योजनेतील लाभार्थ्यांना विजयसिंह पंडित यांच्याहस्ते मंजुरीपत्राचे वाटप

51

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.1फेब्रुवारी):- संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी विशेष सहाय्य योजनेतील सुमारे १२४७ लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप बीड जि.प. चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याहस्ते करण्यात आले. गेवराई तहसिल कार्यालयात प्रातिनिधीक स्वरुपात कोरोना विषयक नियमांचे पालन करून ६० लाभार्थ्यांना उपजिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्यासह संग्रायो समितीचे अध्यक्ष व सदस्यांच्या उपस्थितीत मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले, याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या आदेशाने गेवराई तालुका संग्रायो समितीचे गठन करण्यात आले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे अध्यक्ष राधेशाम येवले व इतर सदस्यांनी अतिशय पारदर्शक कारभार केल्यामुळे तहसिल कार्यालयातील दलालांचा कारभार चव्हाट्यावर आला. विद्यमान भाजपा आमदार यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजुरीपत्र वाटप केलेल्या लाभार्थ्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतानाही अनुदानाची रक्कम मिळू शकली नाही, हे त्यांचे मोठे अपयश आहे. स्वतःच्या अकार्यक्षमतेचे आणि अपयशाचे खापर ते या समितीवर फोडत आहेत. स्वतःचा अकार्यक्षमपणा झाकण्यासाठी आमची बदनामी करून उपोषणाची नौटंकी करत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या भुलथापांना कोणीही बळी पडू नये असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. त्यांनी विद्यमान संग्रायो समितीच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त करून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचे आवाहन केले.

गेवराई तहसिल कार्यालयात विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप करण्याच्या आयोजित कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी चौगुले, तहसिलदार सचिन खाडे, संग्रायो समितीचे अध्यक्ष राधेशाम येवले, सदस्य बापू गाडेकर, शिवाजी डोंगरे, मन्सुर शेख, सय्यद सिराज, रघुनाथ मोरे यांच्यासह अक्षय पवार, दत्ता दाभाडे, वचिष्ट शिंदे, गोरखनाथ शिंदे, संदीप मडके, भाऊसाहेब माखले, राम म्हेत्रे, वसीम फारुकी, आनंद दाभाडे, रवि दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, ऋषिकेश मोटे, निराधार समिती विभागातील कर्मचारी नामदेव खेडकर, विठ्ठल सुतार यांच्यासह गेवराई तालुक्यातून आलेले लाभार्थी उपस्थित होते. संग्रायो समितीने १२४७ प्रकरणे निकाली काढली असून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा रास्त लाभ दिल्याची माहिती संग्रायो समितीचे अध्यक्ष राधेशाम येवले यांनी यावेळी दिली.

Previous articleयावल सांगवी येथील आदीवासी कोळी समाजाच्या मुलीवर अत्याचार करणा-या ंना फाशी द्या वाल्यासेनेचे धुळे एसपीं ना निवेदन.
Next articleडॉ.बाबासाहेब आंबेडकारांची पत्रकारीता व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव परिसंवाद संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here