Home महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या विजयी नगरसेवक यांचा सत्कार सोहळा संपन्न…

महाविकास आघाडीच्या विजयी नगरसेवक यांचा सत्कार सोहळा संपन्न…

259

✒️नायगाव तालुका प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

शिरूर(दि.1फेब्रुवारी):- अनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवार यांचा सत्कार सोहळा जेष्ठ मार्गदर्शक श्री रामराव काका उडदे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मा श्री सुरज दादा चव्हाण, काँग्रेस पक्षाचे नेते डॉ अरविंद भातांब्रे साहेब, शिवसेनेच्या नेत्या डॉ शोभाताई बेंजरगे मॅडम, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव मा श्री अभय दादा सांळुके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा श्री पंडितराव धुमाळ साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला शिरूर अनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 8 विजय नगरसेवक यांचा सत्कार समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सुचित लासूणे यांनी बस्वेश्वर चौक शिरूर अनंतपाळ येथे आयोजित केला होता.

या वेळी बोलताना श्री सुरज चव्हाण यांनी जरी शिरूर अनंतपाळ नगरपंचायतवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली नसली तरी शहरातील जनतेने महाविकास आघाडीचे 8 नगरसेवक निवडून देऊन प्रचंड मोठा विश्वास महाविकास आघाडीवर ठेवला आहे त्यानूसार राज्य सरकारच्या माध्यमातून व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा नामदार श्री अमित भैया देशमुख साहेब व महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर अनंतपाळ शहराचा विकास केला जाईल अशी ग्वाही दिली या वेळी डॉ अरविंद भातांब्रे, डॉ शोभाताई बेंजरगे, श्री अभय दादा सांळुके व श्री पंडितराव धुमाळ यांचे भाषणे झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते महादेव आवाळे यांनी केले तर सुत्रसंचलन अकबर तांबोळी व सोमा तोंडारे यांनी केले.

या वेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री विठ्ठलराव पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री आबासाहेब पाटील उजेडकर, जेष्ठ नेते श्री शिवराज आण्णा धुमाळे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री अशोक कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देवंगरे, शिवसेनेचे शहरप्रमुख सतीश शिवणे, काँग्रेस पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष अँड सुतेज माने, जिल्हा उपाध्यक्ष श्री बबन भाऊ होनमाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष श्री अब्दुल अजीज मुल्ला, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजकुमार बर्गे, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ आण्णा हांद्राळे, जेष्ठ मार्गदर्शक श्री शिवराज आण्णा लासूणे आदि मान्यवर उपस्थित होते या वेळी शहरातील व परिसरातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी तथा मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here