Home महाराष्ट्र भारतीय वडार समाज संघर्ष पार्टी वतीने शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

भारतीय वडार समाज संघर्ष पार्टी वतीने शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

166

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.1फेब्रुवारी):-नाशिक शहर परिसरात नुकताच भारतीय वडार समाज संघर्ष पार्टी ( बि.व्ही.एस.एस.) सातपूर तसेच महिला सामाजिक संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सातपूर येथील मुख्य कार्यालयात सर्व सामाजिक कार्यकर्ते व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती .कोळपा हनुमंत धोत्रे संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्वांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विविध प्रकारच्या फळझाडे, औषधीवृक्ष, व इतर रोपट्यांचे वाटप करण्यात आले. नाशिक मधील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले .

सातपूर विभाग, नवीन नाशिक विभाग ,पंचवटी विभाग , नाशिक रोड , नाशिक अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले .या कार्यक्रमासाठी भगवान देवकर नाशिक जिल्हा अध्यक्ष, रितेश चिखलीकर नाशिक शहराध्यक्ष ,सौ. उषा देवकर महिला शहराध्यक्षा ,योगेश चिखलीकर पंचवटी प्रभाग प्रमुख, मिलिंद चिखलीकर मेरी म्हसरूळ प्रभाग प्रमुख , सौ.राजश्री कौटकर मनवा महिला सामाजिक संस्थेच्या संचालिका, सौ.पुष्पा जगताप सहसंचालिका, प्रियंका कोथमिरे , पार्थ देवकर अभिनेता तसेच दत्ता वाळेकर ज्येष्ठ अभिनेता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे व पार्टीचे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. सर्व मंडळीने कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले .भगवान देवकर तसेच इतर मान्यवर व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी वृक्षांविषयीचे महत्व व उपयोगाविषयी आपापले मनोगत व्यक्त केले .अशा प्रमाणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here