



✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)
गेवराई(दि.31जानेवारी):-गेवराई शहरात अंदाजे २५ % नागरिक आहेत. या उर्दु भाषिक नागरिकांच्या सुविधेसाठी गेवराई नगर परिषद इमारतीवर मराठी भाषेतील नावा बरोबरच उर्दु भाषेत नगर परिषद हे नाव लिहीण्यात यावे. तसेच गेवराई शहरातील वाँर्डांचे नामफलक मराठी व ऊर्दू भाषेत लावण्यात यावेत. या शिवाय गेवराई शहरात उर्दू शाळा व काँलेज असल्यामुळे उर्दू भाषिक विद्यार्थ्यांची व वाचकांची संख्या मोठी आहे.
त्यामुळे गेवराई नगर परिषदेच्या सार्वजनिक वाचनालयात वेगळा उर्दू विभाग निर्माण करून उर्दू भाषेतील विविध ग्रंथांची उपलब्धता करून द्यावी अशी महत्वपूर्ण मागणी गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते अँड. सुभाष निकम, उर्दू साहित्यिक व प्रसिद्ध कवी सय्यद मुजतबा नज्म आणि प्रसिद्ध शायर रगीबूर रहेमान इनामदार यांनी केली आहे. त्या अनूषंगाने दिनांक ३१ जानेवारी रोजी गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांना निवेदन देण्यात आले आह.





