Home नांदेड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची उमरी तालुका कार्यकारिणी जाहीर

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची उमरी तालुका कार्यकारिणी जाहीर

258

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगांव-नांदेड,प्रतिनिधी)मो:-93738 68284

नांदेड,उमरी(दि.31जानेवारी):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेची उमरी तालुक्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष उद्धव मामडे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी .टी.आंबेगावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या आदेशानुसार, जिल्हाउपाध्यक्ष उद्धव मामडे रावधानोरकर यांच्या उपस्थितीत उमरी तालुक्याची नव्याने कार्यकारणी तयार करण्यात आली.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उमरी तालुकाध्यक्षपदी डी.जी. तुपसाखरे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश कारलेकर, सचिव बळवंत पाटील थेटे, कोषाध्यक्ष राहुल सोनकांबळे सोमठाणकर, सहसचिव आनंदा राठोड, व्यवस्थापक पिराजी कराडे, सल्लागार आरीफ शेख, संघटक फेरोज पटेल, सदस्य हणमंत बेंद्रे, शंकर थेटे, कैलास सुर्यवंशी, शेळके यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी सचिव बळवंत पाटील थेटे म्हणाले की, वेळप्रसंगी पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला माफ करणार नाही. या संघामध्ये सहभागी झालेल्या पत्रकारांना घाबरायचे कारण नाही संघटना वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवावे, आपल्या लेखणीचा योग्य वापर करून गोरगरिबांच्या भल्यासाठी निर्भीड बातम्या लिहावे. कोणालाही न घाबरता लिखाण करत जा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा उपाध्यक्ष उद्धव मामडे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तर सूत्रसंचालन आरीफ शेख यांनी केले.

Previous articleइस्ट्राग्राम सोशल मिडियावर झालेल्या ओळखीने युवती सोबत केला अत्याचार
Next articleपालकमंत्र्यांच्या पुढाकाराने उमा नदीवर 25 कोटींचे दोन पुल प्रस्तावित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here