Home महाराष्ट्र राजकारणात खचणारा माणूस यशस्वी होत नसतो – आ.डॉ. रत्नाकर गुट्टे

राजकारणात खचणारा माणूस यशस्वी होत नसतो – आ.डॉ. रत्नाकर गुट्टे

226

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.30जानेवारी):-राजकारणात यश आणि अपयश नेहमी सुरूच असतं. अपयश ही यशाची पायरी असते. त्यामुळे थोड्याशा पराभवाने खचून न जाता अपयशाला संधी मानून नव्या उमेदीने आपण कामाला लागा कारण अपयशाने खचणारा माणूस राजकारणात कधीच यशस्वी होत नसतो, असा कानमंत्र गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित रासप व आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला.शहरातील एम.के.मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रीय समाज पक्ष व आ.डॉ. रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळाच्या कार्यकर्ता चिंतन शिबीरात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

पुढे बोलताना आ.गुट्टे म्हणाले की, आपला पक्ष छोटा आहे. परंतु तरीही आपण चांगली कामगिरी करीत आहोत. प्रस्थापित पक्षांकडे धनशक्ती आहे मात्र आपल्या पाठीमागे जनशक्ती उभी आहे. त्यामुळे त्याच जनशक्तीच्या जोरावर आपण आगामी गंगाखेड व पूर्णा नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरे जाऊ आणि यशाचा गुलाल उधळू. लक्षात ठेवा, अपयशातूनच माणूस पुढे जात असतो. मीही २०१४ ला पराभव बघितला आहे. मात्र मी खचून न जाता तुमच्या सारख्या जिगरबाज कार्यकर्त्यांच्या सोबतीने लढलो. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या संदर्भाने नियोजन करा. कार्यक्रमाची आखणी करा. जनसंपर्क वाढवा.

याप्रसंगी पालम नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या विजयी झालेल्या पठाण उबेदुल्ला नसरूल्ला खान, पठाण समीर खान अजिउल्ला खान, पठाण हैदरखा अब्दुल खा, खुरेशी मुबीन मेहबुब या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष अँड.संदीप आळनुरे, विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके, तालुकाध्यक्ष नारायण दुधाटे यांनीही मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालम-पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड तर आभार गजानन शिरसकर यांनी व्यक्त केले.यावेळी जि.प.सदस्य राजेश फड,जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, पालम-पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब कुरे, अजीम भाई, गणेशराव घोरपडे, असद खाँ पठाण, जबीभाई पठाण,बाबासाहेब एंगडे, राहुल शिंदे,भगवान शिरसकर, सर्व जि.प गटातील सर्कल प्रमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*पराभवाने फरक पडत नाही*
कारागृहात असूनही विजयाचा गुलाल उधळणा-या लढाऊ सेनापतींचे आम्ही शिलेदार आणि मावळे आहोत. त्यामुळे आगामी निवडणुकीत सुध्दा नव्या जोमाने आणि जोशाने काम करून पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून आणू. कारण अपयशाने काहीही फरक पडत नाही, असा विश्वास जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे पाटील यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here