




✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.29जानेवारी):-जागतिक दर्जाचे लेखक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते मा. डॉ. अनिल अवचट (बाबा) यांचे नुकतेच निधन झाले. आपल्यातील संवेदनशील माणूस हरपला. प्रथितयश लेखक, समाजसेवक म्हणून त्यांना सर्वत्र ओळखले जात होते. महाराष्ट्रातील बहुआयामी व अष्टपैलू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी साहित्य निर्मिती तर केलीच परंतु समाजातील नाकारले गेलेल्या लोकांना त्याने आपल्या लेखनातून आवाज देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्याने मुक्तांगण नावाची संस्थाही स्थापन केली. सर्वगुणी आणि बुद्धिमान माणूस म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते.
त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आदरांजली सभा शनिवार, दि. 29 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 5:00 वा. कलादालन, राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे निर्मिती प्रकाशन, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, संवाद प्रकाशन, श्रावस्ती प्रकाशन, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर आणि समविचारी पक्ष, संघटना, व्यक्ती व संस्था यांच्या वतीने आयोजित केली आहे.सदर आदरांजली सभेस कोल्हापूर जिल्ह्यातील विचारवंत व साहित्यिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक अनिल म्हमाने यांनी केले आहे.




