Home महाराष्ट्र माळी समाज पंच मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम

माळी समाज पंच मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम

273

🔸शहरातील प्रतिभावंतांचा गौरव सन्मान सोहळा संपन्न.

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.29जानेवारी): – दि. २८ जानेवारी, २०२२ शुक्रवार रोजी संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ, मोठा माळीवाडा धरणगाव यांच्या वतीने धरणगाव शहरातील शैक्षणिक – सामाजिक क्षेत्रातील प्रतिभावंतांचा गौरव सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सन्मान सोहळ्याचे प्रस्ताविक माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाज पंच मंडळाचे समाज अध्यक्ष विठोबा महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून लोकसभेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माळी समाजाचे उपाध्यक्ष निंबाजी महाजन, सुखदेव महाजन, सहसचिव डिगंबर महाजन, मा.सचिव दशरथ महाजन, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, सुरेखाताई महाजन, प्रा. कविता महाजन, गटनेते कैलास माळी सर, आर.डी. महाजन सर, लहान माळीवाड्याचे विश्वस्त कडू महाजन, परीट समाजाचे प्रकाश बोरसे, मोठा माळीवाडा व लहान माळीवाडा येथील सर्व सन्माननीय पंच मंडळाचे सल्लागार पंच उपस्थित होते.
सत्कारमूर्ती म्हणून लक्ष्मी गोपाल महाजन, पुनम अण्णा माळी, पी.डी.पाटील, मनोज अशोक माळी, पारस रविंद्र महाजन, उपस्थित होते.

सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यानंतर सत्कारमुर्ति मोठा माळीवाडा रामलीला चौक येथील लक्ष्मी गोपाल महाजन हिची नामांकित टाटा टीसीएल कंपनी मध्ये असिस्टंट सिस्टम इंजिनियर म्हणून निवड झाली, पुनम अण्णा माळी हिची एम.जे.एम.या आय.टी कंपनीत ग्राफिक डिझाईनर म्हणून निवड झाली, सावित्रीबाई फुले चौक येथील मनोज अशोक माळी यांची महात्मा फुले ब्रिगेड युवक आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली, रामलीला चौक येथील पारस रवींद्र महाजन हे आर्मीमध्ये निवड झाली, महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे उपशिक्षक पी.डी.पाटील यांना मागील शैक्षणिक वर्षी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाच्या वतीने सर्व सत्कारमूर्तींचा महापुरुषांचे ग्रंथ – शाल- पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्ती लक्ष्मी महाजन, पुनम माळी, मनोज माळी, पारस महाजन, पी.डी.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले, शिक्षणामुळेच जीवनाचा उद्धार होतो.

याप्रसंगी माळी समाज पंच मंडळाने आमच्या सत्कारमूर्तींचा केलेला सन्मान हा प्रेरणादायी असून ही कौतुकाची व शाबासकीची थाप आम्हाला भविष्यात प्रेरणा देईल असे प्रतिपादन सत्कारमूर्ती यांनी केले.या प्रतिभावंतांच्या सत्कार – सन्मान सोहळ्याप्रसंगी संजय महाजन, कैलास माळी सर, ज्ञानेश्वर महाजन, आर.डी. महाजन सर, मा.नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, गुलाबरावजी वाघ या मान्यवरांनी सर्व सत्कारमुर्तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक – सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सर्व सत्कारमूर्तींचे कार्य प्रेरणादायी आहे. आजच्या नवीन पिढीने यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुढे जावे अशी भावना व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी विजय महाजन, गोपाल महाजन, अण्णा महाजन, सुभाष महाजन, भगवान महाजन, रमेश आप्पा, आबासाहेब राजेंद्र वाघ, कांतीलाल महाजन, युवराज महाजन, दामाजी महाजन, वासुदेव महाजन, भदाणे सर, माळी ग्रामसेवक आप्पा, मोठा माळीवाडा परिसरातील सर्व तरुण मित्र तसेच बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन माळी समाजाचे सचिव गोपाल माळी तर आभार माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोठा माळीवाडा परिसरातील सर्व तरुण युवक मित्र परिवाराने व माळी समाज पंचमंडळ सर्व सल्लागार पंच यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here