Home गडचिरोली कोविड योध्यांचे थकीत मानधन देण्याकरिता ना.विजय वडेट्टीवार 8 करोड चा निधी उपलब्ध...

कोविड योध्यांचे थकीत मानधन देण्याकरिता ना.विजय वडेट्टीवार 8 करोड चा निधी उपलब्ध करून देणार

347

🔸काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या प्रयत्नांना यश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.29जानेवारी):- मागील दोन वर्षा पासून संपूर्ण देशात कोरोन महामारीने थैमान घातले असतांना अशा परिस्थितीत मायक्रोबायोलाजिस्ट, टेकनिशीअन, असिस्टंट, अटेंडेंट, वॉर्ड बॉय सारख्या अनेक वैद्यकीय व अवैद्यकीय पदांवर कोविड योध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वोतोपरी प्रयत्न करून कोविड रुग्णालयात सेवा दिली.

परंतु मागील सहा महिन्यांपासून यांना मानधन मिळाले नसून यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र यांच्या कडे थकीत मानधन मिळवून देण्याची मागणी केली या मागणीचा महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या कडे पाठपुरावा केले असता मा. मंत्रिमहोदयांनी कोविड योध्यांचे थकीत मानधन लवकरात लवकर मिळावे याकरिता आपण ८ करोड चा निधी ८ दिवसाच्या आत तात्काळ उपल्बध करून देणार असल्याचे सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here