Home महाराष्ट्र मुंबई रेल्वे लोकल प्रवासातील सुखदुखाची मैत्री

मुंबई रेल्वे लोकल प्रवासातील सुखदुखाची मैत्री

160

भारताची औधोगिक राजधानी म्हणजे सोन्याचे अंडे देणारी मुंबई.इथे हजारो लाखो लोक पोटभरण्यासाठी येतात.जे रोजी रोटी कमवून दररोज अंडे खाऊ शकतात.पण चुकीचे वागून सोन्याची कोंबडी कापून खाल्यास कायमची मुंबई सोडून पळून जावे लागते.कारण मुंबई जेवढी चांगली आहे त्यापेक्षा वाईट बदमाश भाईची सुद्धा आहे. चाकरमान्याची ही मुंबई सकाळी चार वाजता जागते आणि दोन वाजता झोपते.यांची जलद रक्तवाहिनी म्हणजेच मुंबई रेल्वे लोकल बाहेर गावावरून आलेले लोक गर्दी पाहूनच अर्धी हिंमत हारून जातात.जो हिंमत करून लोकल मध्ये चढला आणि उतरला तोच मुंबईत टिकला.विरार ते चर्चगेट सकाळी ७:४० ची दररोज धावणारी लोकल.त्यात दररोज प्रवास करणारे मित्र विरार नालासोपारा वसईला चढतात आणि उतरतात.त्यामुळे गेली दहा बारा वर्ष एकत्र प्रवास करणारा ग्रुप म्हणजे जिवलग मित्र एकमेकांच्या सुखादुखात कायम सहभागी होत असतात.

सचिन बावकर यांचा (कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा), ३० वा वाढदिवस २४ जानेवारीला,देवचंद पवार जिल्हा रायगड तालुका तळा यांचा २७ जानेवारीला ३६ वा वाढदिवस साजरा झाला.असे दररोज कोणाचा ना कोणाचा वाढदिवस घरी किंवा कार्यालयात साजरा होण्या अगोदर मुंबई रेल्वे लोकल मध्ये साजरा होतो.जवळ जवळ १२ वर्ष झाली,संजय धुमाळ,योगेश बने,संतोष थारली,सचिन बावकर,अरुण कदम,तेरवणकर,विकास सुर्वे,तांबे,अखिलेश,केशव बावकर,गावकर असे कोकणातील वीस ते पंचवीस प्रवाशी दररोजचे जिवलग मित्र झाले आहेत. सर्वांचे बर्थडे रेल्वे लोकल मध्ये साजरा करतात.आणि सुखा दुःखातपण नेहमीच सहभाग होत असतात.

सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक किंवा शारीरिक कोणतीही कोणाला काही अडचण असल्यास सर्वच मदतीला धावतात.अशी मुंबई रेल्वे लोकल प्रवासातील सुखदुखाची मैत्री अनेकांना प्रेरणादायी असते.म्हणूनच आम्ही तिला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणतो.

✒️देवचंद पवार(विरार)मो:-७७१८०६०७३७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here