




🔸समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाची मागणी
·🔹ग्रामीण भागातील विद्यार्थांना फटका
🔸एसडीओमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.28जानेवारी):-सामाजिक न्याय, समाजकल्याण विभागातील पदभरतीसाठी समाजकार्य पदवी, पदवीधर हीच ठेवा तसेच राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा न घेता सरळसेवा पद्धतीने घ्यावी अशी मागणी समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखेचा पदाधिका-यांनी चिमुरचे एसडीओमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सामाजिक व विशेष सहाय्य विभागात अनेक जागा रिक्त आहेत. अशातच महिला व बालविकास विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहाय्यक आयुक्त, परीविक्षा अधिक्षक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी गट-अ या पदभरतीच्या नियमात शासनाने बदल केले आहे. ही सर्व पदे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फतीने भरण्यात येणार आहेत. अचानक केलेल्या या बदलांचा फटका लाखो ग्रामीण भागातील विद्यार्थांना बसणार आहे. सरळसेवा व राज्यसेवा या दोन वेगवेगळ्या परीक्षा पद्धती आहेत. गेल्या तीन वर्षापासून विद्यार्थी सरळसेवेची तयारी करीत आहेत. आता अचानकपणे राज्यशासनाने परीक्षा घेतल्यास विद्यार्थांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सदर पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता समाजकार्य पदवी व पदव्युत्तर हीच ठेवण्यात यावी. तसेच ही पदभरती सरळसेवेने घ्यावी. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील समाजकार्य विद्यार्थी तीव्र आंदोलन करणार असाही इशारा समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखेचा पदाधिका-यांनी दिला आहे.
निवेदन देताना समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष अक्षय लांजेवार, सचिव राहुल मडावी, चिमूर तालुका महिला अध्यक्षा ममता वंजारी, सचिव काजल पांगुळ, चिमूर शहर अध्यक्ष रोहन नन्नावरे, पवन इंगोले उपस्थित होते.
———————————————
शासनाने या परीक्षासाठी नियम बदलताना विद्यार्थांना किमान १ वर्ष अगोदर सूचित करणे अपेक्षित आहे. कारण दोन्ही परीक्षा पद्धती वेगवेगळ्या आहेत. अचानक बदल केल्याने याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थांना बसणार आहे.
………….. अक्षय लांजेवार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा शाखा चंद्रपूर




