Home महाराष्ट्र देवेन्द्र फडवणीस यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करावी-तुळशीराम वाघमारे

देवेन्द्र फडवणीस यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करावी-तुळशीराम वाघमारे

218

🔸संत रविदास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांची मागणी

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.28जानेवारी):-महाराष्ट्र राज्याचे माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हजरत टिपू सुलतान यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले या विरोधात सर्व मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या असून महापुरुषाच्या विरोधात महाराष्ट्रात चुकीचे अपशब्द बोलले जात आहे.

यावर आवर घालणे गरजेचे असून टिपू सुलतान यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणारे महाराष्ट्र राज्यचे माझी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी पत्रकार तथा संत रविदास प्रतिष्ठान चे संस्थापक तुळशीराम वाघमारे ,आप्पा सोनटक्के,सुनीताताई नेटके,शेषेराव पोटे,राहुल डोंगरे,जितेंद्र खरात, प्रशांत उनवणे,बाबा गोरे,यांच्यासह पदाधिकारी यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here