Home पुणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने अनाथ आश्रमात प्रजासत्ताक...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने अनाथ आश्रमात प्रजासत्ताक दिन साजरा

218

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे, पिंपरी चिंचवड(दि.28जानेवारी):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने अनाथ आश्रमात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. लहान मुले म्हणजे देशाचे भविष्य घडवणारी पिढी या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनाचे महत्व जाणून बालगोपालांसमवेत आनंदाचे वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने हा प्रजासत्ताक दिन चिखली येथील विकास अनाथ आश्रमात आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री राजन नायर, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा सौ. मंदाताई बनसोडे, डॉ. संगीता उके, मंगला जैन, कु. बिना जैन, मनोज कुमार ठाकूर आणि प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांना प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणासह मुलांना बिस्किटे, फळ देऊन आश्रमातील मुलांबरोबर हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुलांशी हितगुज करण्यात आले.यावेळी स्टार बुक ऑफ रेकॉर्ड म्युझीक मध्ये नोंद झालेली (दिव्यांग) बिना जैन हिने वाद्यवृंदावर (सिंथेसायझर) गाणी वाजवून वातावरण संगीतमय केले. तसेच देश भक्ती गीतांवर सर्वांना मंत्रमुग्ध केले. ‘देवा श्री गणेशा’ या गाण्याने गणेशाला नमन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. “हे मेरे वतन के लोगो जरा आखो मे भरलो पाणी” या देशभक्तीपर गाण्यांसह, सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गाणे पल पल दिल के पास तसेच लकडी की काठी सारखे बालगीतांसह अनेक गाण्यांने वातावरण मंत्रमुग्ध झाले तसेच झिंगाट गाण्यावर आनंदमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here