



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.27जानेवारी):-संत रविदास चौक येथे 26 जानेवारी 2022 संत रविदास चर्मकार समाजा तर्फे गणराज्य दिनाला ध्वजारोहण श्री. जगदीश भसाखेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री आकाश भसाखेत्रे अध्यक्ष,श्री गणेश मुळे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.गणराज्य दिनाच्या औचित्त साधुन स्वातंत्र्य भारताला 75 वर्ष पुर्ण झाले तर हा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला.
संपूर्ण संत रविदास महाराज मंदिर आणि संत रविदास चौक दिवे लाऊन दिप मय करण्यात आले.श्री गणेश मुळे यांना शाल व श्री फळ देऊन गौरविण्यात आले. प्रामुख्याने श्री ऋषीभाऊ बसेशंकर, आकाश भसाखेत्रे, डॉ. सुभाष शेकोकर ,अड. जयप्रकाश अंडेलकर, आषीश घुबडे, श्रीराम पाटील, अंकज कानझोडे, तुषार पाटील ,जयपाल अंडेलकर, गोपाल भसाखेत्रे,आणि संपूर्ण समाज बांधव तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


