




🔹उपोषणाचा तिसरा दिवस प्रशासन मात्र उदासीन
✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगांव प्रतिनिधी)
हदगाव(दि. 27जानेवारी):-येथील हदगाव पोलिस आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने कटकारस्थान करून संगनमताने माननीय, जिल्हाधिकारी. माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड.यांना निवेदन देऊन पत्रकार क्षेत्रावर दबाव टाकण्याचे कटकारस्थान रचून वृत्तपत्र चालक आणि पत्रकार यांचेवर कारवाई करण्याची मागणी करून कायद्याच्या चौथ्या स्तंभाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ माय माऊली न्यूज चैनल चे नांदेड जिल्हा( उत्तर) प्रतिनिधी प्रकाश जाधव. दैनिक युगांतर. चे हादगाव तालुका प्रतिनिधी वैजनाथ गुडूप. यांनी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी दिनांक २५/११/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणास प्रारंभ केला असून यांचा आज तिसरा दिवस आहे त्यांनी दिनांक १८/१/२२ रोजी माननीय पोलीस अधीक्षक नांदेड यांची भेट घेऊन निवेदन दिले.
पत्रकार.वैजनाथ गुडूप. प्रकाश जाधव. हे दिनांक २५ जानेवारी पासूनआमरण उपोषणास सुरुवात केली असताना अद्यापही कोणतेही प्रशासन यंत्रणेने त्यांची विचारपूस अथवा त्यांना भेट दिली नसल्याचे उपोषण करते सांगत असून प्रशासन आमच्याकडे कानाडोळा करून आमच्या निवेदनातील मागण्या मंजूर करून आम्हास न्याय देण्यासाठी दबावाखाली आहे की काय अशी शंका उपोषणकर्ते उपस्थित करीत असून आमचे बरेवाईट झाल्यास स्थानिक प्रशासन जबाबदार असून माननीय, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक साहेब. माननीय, जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब. आमच्यापत्रकारांच्या आमरण उपोषण आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य करून आम्हास न्याय मिळवून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यास देतील अशी आशा उपोषणकर्ते बोलून दाखवित आहेत.




