



राज्यसेवा पूर्व परीक्षेचा (एमपीएससी) पेपर रविवारी दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार होता, तरी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याची अंतिम वेळ 9:30 ठरविण्यात आली होती. अनेक विद्यार्थी एमपीएससी परीक्षेस मुकले, 5-10 मिनिटांचा उशीरही मारक ठरला. राज्यभरातील केंद्रांवर रविवारी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. मात्र, मेगाब्लॉकमुळे मुंबईत काही विद्यार्थ्यांना ‘रिपोर्टिंग टाइम’ पर्यंत पोहोचता न आल्याने प्रवेश देण्यात आला नाही. परिणामी, त्यांना परीक्षेस मुकावे लागले. मेगाब्लॉक आणि अन्य काही अडचणींचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागला. बरेच जण केवळ 5 ते 10 मिनिटे उशिरा पोहोचले होते. सिडनहॅम कॉलेज केंद्रावर 15 विद्यार्थ्यांसोबत असाच प्रकार घडला. तर औरंगाबादला 28 टक्के विद्यार्थ्यांनी दांडी मारली. पहिला पेपर गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कठीण होता. विज्ञान, इतिहास आणि भूगोल विषयाचे पेपर कठीण होते. त्यामुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाल्याचे संकेत मिळाले. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सी-सॅटचा पेपर सोपा होता.
नागपुर शहरात रविवारी सकाळी 10 वाजता शहरातील साऊथ अर्न पॉईंट स्कूलच्या केंद्रावर एमपीएससी पूर्व परिक्षेचा पेपर होता. विद्यार्थ्यांकडून हा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे परीक्षा केंद्राबाहेर एकच गोंधळ माजला. नागपुर शहरातील साउथ अर्न पॉईंट स्कूल येथे एमपीएससी परीक्षा केंद्रात परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकारानंतर केंद्रावर एकच गोंधळ उडाला व अभाविपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रप्रमुखांना जाब विचारण्यासाठी केंद्रापुढे आंदोलन केले. तर, एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा कुठलाही पेपर फुटला नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.
रविवारी सकाळी 10 वाजता शहरातील साऊथ अर्न पॉईंट स्कूलच्या केंद्रावर एमपीएससी पूर्व परिक्षेचा पेपर होता. हा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त केल्या गेला. या परीक्षेच्या प्रश्नसंचाचा सील आधिच फोडण्यात आला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. सकाळी 10 वाजताचा हा पेपर होता. दरम्यान, एका विद्यार्थ्याला पेपरसंचाचे सील उघडले असल्याचे दिसून आले. त्याने याबाबत आपल्या मित्राला माहिती दिली. त्यानंतर, पेपर पूर्ण झाला मात्र तोपर्यंत अभाविपचे कार्यकर्ते केंद्राबाहेर जमले व पेपर फुटल्याचे म्हणत आंदोलन सुरू केले. दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे देखील केंद्रावर आले. त्यांनी केंद्रप्रमुखांना जाब विचारत आग्रही भूमिका घेतली. यानंतर, गोंधळ वाढला व पोलिसांनीही केंद्रावर पोहचत मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने असा कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.एमपीएससीने 2020 मधील गट ब च्या पूर्व परीक्षेत प्रश्न चुकल्याने याचिका दाखल केलेल्या अवघ्या 86 जणांनाच मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. इतर 3 हजार 500 विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे इतर विद्यार्थीही आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा येत्या 29 आणि 30 जानेवारी रोजी घेण्यात येत आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा निकाल जाहीर करताना आयोगाकडून उत्तरतालिका तीन वेळा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या उत्तरपत्रिकेवर काही विद्यार्थ्यांकडून अक्षेप घेण्यात आला होता. उत्तरपत्रिकेत अनेक प्रश्नाचे उत्तरे चुकीचे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता.
याविरोधात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाकडून या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे विद्यार्थी एका मार्कामुळे मुख्य परीक्षेपासून वंचित राहिले त्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती, त्याच 86 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. 86 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आल्याने इतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. तर, काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले आहे.
दुसरीकडे आमदार कपिल पाटील यांनी देखील या प्रकरणी लक्ष घातले आहे. एमपीएससी परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी आमदार कपिल पाटील यांनी थेट एमपीएससी आयोगाच्या अध्यक्ष, सचिवांना पत्र लिहिले आहे. एकामुळे सुमारे 3500 विद्यार्थी मुख्य परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या 86 विद्यार्थ्यांप्रमाणे इतरही विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याची मागणी केली आहे. कपिल पाटील यांनी काल रात्री पुण्यात येऊन एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेतली. एमपीएससीने 2020 मधील गट ब च्या पूर्व परीक्षेत प्रश्न चुकल्याने याचिका दाखल केलेल्या अवघ्या 86 जणांनाच मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. इतर 3 हजार 500 विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला बसू देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.एमपीएससीने 86 विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आदेश काढले आहेत. अराजपत्रित दुय्यम सेवा गट ब 2020 च्या मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर एमपीएससीने आदेश काढले आहेत.
विद्यार्थ्यांना 27 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या 86 विद्यार्थ्यांना 29 आणि 30 जानेवारीच्या परीक्षेला बसता येणार आहे. केवळ न्यायालयात गेलेल्या 86 जणांना परीक्षा देता येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक करीता मा.उच्च न्यायालय,मुंबई यांनी दिलेल्या आदेशानुसार 86 विद्यार्थ्यांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.एमपीएससी 2020 च्या जाहीरातीमधील पीएसआय पदाच्या विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचा फटका बसला आहे. त्या संदर्भात 86 विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या 86 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला परवानगी देण्याची उच्च न्यायालयाने एमपीएससीला आदेश दिले. मात्र पूर्व परीक्षेचा निकालचं परत लावावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. 86 विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हालाही मुख्य परीक्षेला बसू द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थी औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार आहेत. 3 हजार 500 विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचा फटका बसला आहे. त्यामुळे निश्चितच सर्वच विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसू देण्यात यावी. जर चुकीचा प्रश्न टाकलाच नसता, तर हा गोंधळ झालाच नसता. त्या अनुषंगाने 3 हजार 500 विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यायलाच पाहिजे.
✒️शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)मो:-7057185479


