Home महाराष्ट्र उदयकुमार पगाडे यांना इंटरनॅशनल आयडल अवॉर्ड-२०२२ देऊन विशेष सन्मान

उदयकुमार पगाडे यांना इंटरनॅशनल आयडल अवॉर्ड-२०२२ देऊन विशेष सन्मान

279

🔹प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तहसील कार्यालयात झाला सत्कार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.26जानेवारी):-कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व प्रकारचे मोठं मोठे कार्यक्रम, उत्सव घेण्यास राज्यसरकारची सक्त मनाई असल्यामुळे, 2022 ह्या वर्षातील नाशिक येथे निर्वाण फाऊंडेशन मार्फत होणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला. त्यामूळे ह्या संस्थेमार्फत भारतातील सर्वच क्षेत्रातील निवडक पुरस्कार्थींना त्यांच्या राज्यातील तालुका किंवा जिल्हा प्रशासनामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष गौरविण्यात येईल, असे संस्थेचे अध्यक्ष श्री.निलेश आंबेडकर यांनी घोषित केले होते.

त्यातच आज, 26 जानेवारी 2022 रोजी ब्रम्हपुरी येथे तहसील कार्यालयात झालेल्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन झाल्यानंतर लगेच उपस्थित मान्यवर उपविभागीय अधिकारी श्री.संदीप भस्के साहेब, तहसीलदार सौ.उषा चौधरी मॅडम, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री.मिलिंद शिंदे साहेब यांच्या हस्ते ब्रम्हपुरीचे युवा सामाजिक कार्यकर्ते श्री.उदयकुमार सुरेश पगाडे यांना समाजसेवा क्षेत्रातील निःस्वार्थ कामगिरीसाठी सर्व जनतेसमोर मोठ्या व्यासपीठावर “इंटरनॅशनल आयडल अवॉर्ड-2022” हा सन्मान देऊन गौरविण्यात आला.

मागील सहा वर्षांत केलेल्या निःस्वार्थ समाजकार्याचा विशेष पाठपुरावा करीत, संस्थेने यांची निवड पुरस्कारासाठी केली, असे सांगितले. संस्थेमार्फत पुरस्काराचे स्वरूपात मेडल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. या पुरस्काराचे सर्व श्रेय उदायकुमार पगाडे यांनी आपल्या स्वर्गीय वडील सुरेश पगाडे, आई श्रीमती.मायाताई पगाडे व सर्व सामाजिक सहकाऱ्यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here