



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.27जानेवारी):-बुधवार 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान महादेव बापूराव पचारे (35) रा. विठ्ठल मंदिर वार्ड, घुग्घुस यांनी राहते घरी कोणीच नसतांना ओढणीने फाट्याला गळफास लावून आत्महत्या केली.सहा.पो.नि.संजय सिंग यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केले व मृतदेह शवविच्छेदना साठी चंद्रपूर येथे पाठविला पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील घुग्घुस पोलीस करीत आहे.मृतक इसम हा विवाहित असून एक पत्नी व दोन मुली आहेत. आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही.
वेकोली कर्मचाऱ्याच्या मृत्यू बुधवार 26 जानेवारी रोजी रात्री दरम्यान विनोद किसन बोबडे (56) रा. नायगाव ता. वणी जिल्हा यवतमाळ वेकोली कर्मचारी हा घुग्घुस येथील रेल्वे सायडींग वर कामावर असतांना आगी जवळ शेकत असतांना अचानक खाली कोसळून मृत्यू झाला पोलिसांनी मर्ग दाखल केला असून घुग्घुस पोलीस करीत आहे. काही दिवसा पूर्वी घुग्घुस येथील शालिकराम नगर येथे राहणाऱ्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली तर बेलसनी येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली सध्या गळफास लावून आत्महत्या करण्याचे प्रमाण घुग्घुस परिसरात वाढले आहे.


