



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.27जानेवारी):-मौजे वडगाव (स्टे) येथे 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. माजी सैनिक शेषेराव बाळस्कार यांच्या हस्ते बौद्ध विहाराकडे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृतीस पुष्पहार अर्पण करून ग्रामपंचायत येथे ध्वजारोहणा चा कार्यक्रम संपन्न झाला.तसेच मा.गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केंद प्रमुख तुकाराम मुंडे व जि. प.के.शाळा चे मुख्याध्यापक सोनवणे सर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद वाव्हळे(पत्रकार) यांनी केले.
शासनाने कोरोना च्या पार्श्वभूमी चे सर्व नियम अटी पाळून प्रजासत्ताक दिन साजरा झाला या कर्यक्रमासाठी सरपंच अरुण डाके,उपसरपंच गणपत बचाटे,चेअरमन जयप्रकाश बचाटे,अमोल बचाटे, भागवत बांगे,रामेश्वर बचाटे, राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हा सरचिटणीस परभणी राजेभाऊ बचाटे पत्रकार व ग्रामपंचायत सेवक व अंगणवाडी कर्मचारी, आशाताई व समस्त गावकरी यांच्या पुढाकाराने कार्यक्रम यशस्वी झाला.





