Home महाराष्ट्र हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गार्डन आजही प्रलंबित का?:- पँथर डॉ. राजन माकणीकर

हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गार्डन आजही प्रलंबित का?:- पँथर डॉ. राजन माकणीकर

76

🔸आमदार रमेश लटके यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.27जानेवारी):; स्थानीक आमदार रमेश लटके सत्ताधारी असून, सोसायटीचे मुख्य सल्लागार राहून ही हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गार्डन आजही प्रलंबित का? शिवाय आमदारांनी आपली भूमिका स्पस्ट करावी असा आशावाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी केला.*

ओंकार दर्शन सोसायटी गुंदवली अंधेरी येथे असून याच सोसायटी चे मुख्य सल्लागार पदी स्थानिक आमदार रमेश लटके नि कार्यभार सांभाळला मात्र स्थानिक आमदार हे सत्तेत असतानाही येथे गार्डन का होत नाही? असा सवाल विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला आहे.

विकासकाने सदरची जागा गार्डन साठी लिखित देऊनही या जागेवर प्रश्नचिन्ह का आहे? असे समजले जाते की या जागेवर विकासकाला पार्किंग टॉवर उभारायचा आहे, विकासकाने तसा SRA ला पत्रव्यवहार ही केला आहे किंतु सर्वकाही शक्य असतांना शिवसेना आमदार डोळेझाक का करत आहेत? हा प्रश्न महत्वाचा वाटत असल्याचे डॉ माकणीकर म्हणाले

SRA ला पार्किंग टॉवर ची गरज आहे का? गरीब जनतेच्या मूलभूत गरजाकडे लक्ष देण्याऐवजी विकासकासह संगनमत करून स्थानिक आमदार रमेश लटके गार्डन च्या ऐवजी पार्किंग टॉवर ला महत्व देत असतील तर हे जनता होऊ देणार नाही रिपाई डेमोक्रॅटिक याचा पाठपुरावा करत आहे असेही ते म्हणाले.

आमदार रमेश लटके गार्डन न होण्याच्या कारणाला सर्वस्वी जवाबदार असून केवळ विकासक गार्डन बनवत नाही असे उत्तरे देणे म्हणजे “दाल मे कुछ काला जरूर हैं.” असा संभ्रम होत असून 15 दिवसात गार्डन चे काम चालू करावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या प्रश्नी आमदारांना घेराव घालेल असा इशारा पँथर माकणीकर यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here