Home महाराष्ट्र चामोर्शी: – सेवानिवृत्ती इंजिनीयर दिलीप गौररकर यांचा सपत्नीक सत्कार

चामोर्शी: – सेवानिवृत्ती इंजिनीयर दिलीप गौररकर यांचा सपत्नीक सत्कार

246

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी तालुका प्रतिनिधी)

चामोर्शी(दि.27जानेवारी):-मौजा लक्ष्मणपूर येथे इंजिनीयर दिलीप गौरकर यांचा सपत्नीक सत्काराचा कार्यक्रम २६ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमाला गावातील जय हनुमान मंदिर समिती आणि सार्वजनिक किंवा गणेश मंडळाच्या वतीने हा सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक मधुकर पाटील गौरकर हे होते. गाववासियांकडून श्री गौरकर यांना शिवाजी महाराजांची प्रतिकृती,शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मनोगतात भावूक झालेले गौरकर म्हणाले की, माझ्या गावांनी मला भरभरून प्रेम दिले.

हे प्रेम असेच पाठीशी कायम राहो ! मी हा क्षण कधीही विसरू शकत नाही. ३५ वर्षांच्या सेवाकार्यातील हा अनमोल क्षण आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंदना गौरकर पंचायत समिती उपसभापती. नीलकंठ पा निखाडे सरपंच येनापुर, अनिलराव निखाडे, अशोक झाडे,दादाजी पा. बल्की,दादाजी पा. निखाडे गुरुदास बल्कि, हेमराज निखाडे, विशाल गौरकार, विजय भाऊ डाहुले, विजय पा. ढुमणे तथा गावातील सर्व मंडळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गुरू बल्की यांनी केले. सूत्रसंचालन विकास गौरकर
तर कार्यक्रमाचे आभार विशाल गौरकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here