



🔹निराधार गरजूंना आधार देणाऱ्या अंकुश घारड यांचे नागरिकांनी मानले आभार !
🔸भव्य शिबिरामध्ये सहभागी होऊन विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.27जानेवारी):- शहरातील सर्वसामान्य नागरिकांची महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे व विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अंकुश घारड यांनी ड्रायव्हिंग लायसन्स, ई श्रम कार्ड, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, व अपंग बांधवांकरिता अपंग स्मार्ट कार्ड यासह विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून भव्य शिबिराची सुरुवात करण्यात आली.सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या तत्काळ निराकरणासाठी या अभिनव उपक्रमाची सुरुवात आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये पहिल्यांदाच करण्यात आली असून मोर्शी येथील कामगार भवन येथे नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकाच छताखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आतापर्यंत कोणत्याही शासकीय कामाकरिता शासनाच्या दारी जावे लागत होतं. पण आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने नागरिकांच्या दारावर जाऊन सेवा देण्याचे कार्य सुरू झाले आहे. मोर्शी तालुक्यामध्ये प्रथमच सर्व यंत्रणा एकाच ठिकानी उपलब्ध करून विविध सेवा सुविधा पुरवण्याचे कार्य सुरू झाले आहे .
या शिबिरामध्ये श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, ड्रायव्हिंग लायसन्स, ई श्रम कार्ड, अपंग बांधवांकरिता अपंग प्रमाणपत्र, अपंग स्मार्ट कार्ड यासह आदी विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात येत असून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. या ठिकाणी नागरिकांना त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी लेखन कक्ष, अर्जवाटप कक्षाची सुविधा यासह छायाचित्र, झेरॉक्स आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. दिव्यांग नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेत आहे. यासह विविध विभागाचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आले असून मोर्शी तालुक्यातील नागरिकांनी उपक्रमामध्ये सहभागी होऊन विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंकुश घारड यांनी केले .
【 】
शासनाच्या विविध विभागामार्फत पुरवले जाणारे सर्व प्रमाणपत्र सेवा सुविधा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही परिवर्तनाची सुरुवात आहे, आमदार देवेंद्र भुयार हे लोकसेवेचे कार्य करत असून नागरिकांना कुठलाही त्रास न होता विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. — अंकुश घारड शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस .


