Home बीड महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंढे...

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंढे बीड जिल्ह्य़ातील नागरीकांना कधी न्याय देणार??

321

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.26जानेवारी):- जिल्ह्य़ातील विविध विभागातील मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाला असून जिल्हाप्रशासनातील वरिष्ठ आधिकारी तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी आणि सत्ताधारी राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते यांच्या संगनमतानेच कोरोना कालावधीत कोट्यावधी रूपयांच्या खरेदी केवळ कागदोपत्रीच केल्याचे दाखवुन कोट्यावधी रूपयांचा अपहार करण्यात आला असून सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांनी वारंवार निवेदन, आंदोलनानंतर सुद्धा कोणतीही चौकशी अथवा कारवाई करण्यात आली नाही.

वरीष्ठ उपसंचालक डाॅ.एकनाथ माले यांनी सुद्धा वारंवार बीड जिल्हा हिवताप कार्यालयातुन बोगस प्रमाणपत्र वितरीत प्रकरणात तसेच रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहार प्रकरणात तसेच प्रेरणा प्रकल्प अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात भ्रष्ट आधिका-यांची पाठराखण केली असून त्यांचीही उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी तसेच ज्यांच्यावर गैरव्यवहार प्रकरणात आरोप आहेत असे जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी आदि मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येऊन जिल्हाधिकारीबीड, उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, आरोग्य मंत्री,आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक यांना निवेदन देण्यात आले, यावेळी आंदोलनात शेख युनुस च-हाटकर,सुदाम तांदळे, सुभाष बांगर संदिप जाधव, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन, गणपत गिरी, रावसाहेब शेळके आदि सहभागी होते.

कारवाई न झाल्यास जनहीत याचिका दाखल करणार:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात सीबीआई व लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीची मागणी प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषणाद्वारे करण्यात आली असून ठोस कारवाई न झाल्यास औरंगाबाद खंडपीठात जनहीत याचिका दाखल करण्यात येणार असून वर्षभरापासुन ज्यांना निवेदन देण्यात आली आहेत त्या आधिकारी, प्रशासनासह सर्वांनाच न्यायालयात खेचणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here