Home महाराष्ट्र प्रजासत्ताक दिनी संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडून पी.डी.पाटील यांचा गौरव

प्रजासत्ताक दिनी संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडून पी.डी.पाटील यांचा गौरव

38

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.26जानेवारी);– सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. एस. एस.सी.बोर्डाच्या परीक्षेत शाळेतुन द्वितीय आलेली विद्यार्थिनी कु.वैशाली गुलाब माळी हिच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे उपक्रमशिल शिक्षक पी.डी.पाटील यांना मागील शैक्षणिक वर्षी पुणे येथील पत्रकार भवन येथे “उपक्रमशील शिक्षक पुरस्कार “, मुंबई येथे ” राज्यस्तरीय महात्मा जोतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार “, धुळे येथे खान्देशस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. आज रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष नानासो. ज्ञानेश्वर भादू महाजन यांनी सावित्रीमाईंचा जन्मोत्सव हा अनमोल ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला व पुढील शैक्षणिक – सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासो. ज्ञानेश्वर महाजन, संचालक सुकदेव महाजन, सुभाष महाजन, गोपाल महाजन, मोतीलाल महाजन व सर्व सन्मानणीय संचालक मंडळ, शाळेचे माजी मुख्याध्यापक एस.डब्ल्यु.पाटील, एम.के.महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका पी.आर. सोनवणे, नुतन प्राथमिक विद्यामंदीरचे मुख्याध्यापक अतुल सुर्यवंशी, शाळेचे पर्यवेक्षक जे.एस.पवार तसेच सर्व शिक्षक बंधू – भगिनी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here