Home बीड १ हजार ५४७ रुग्णांपैकी १ हजार ४२६ बाधीत घरीच घेतात उपचार

१ हजार ५४७ रुग्णांपैकी १ हजार ४२६ बाधीत घरीच घेतात उपचार

233

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.25जानेवारी):-जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याने प्रशासनासह नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण होत असतानाच सुखद माहिती समोर येत आहे.जिल्ह्यात एकूण १६०० च्या आसपास ऍक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल १४५० रुग्ण हे घरीच आयसीलेट होत उपचार घेत आहे तर बीड जिल्हा रुग्णालयात केवळ १० रुग्ण उपचार घेत असून यातील एकाही रुग्णाला व्हेंटीलेटरची गरज भासलेली नाही.तिकडे अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एकूण तीन वॉर्डात १५ रुग्ण असून यामध्ये ४ गरोदर महिलांना कोरोनाची लागण झालेली आहे. यापैकी १० रुग्णांना एखाद दुसर्‍या लिटरने ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे सध्या रुग्ण वाढत असले तरी विषाणूची तीव्रता ही तेवढी भासत नाही.

दुसरीकडे मात्र १७ जानेवारी ते २३ जानेवारीच्या दरम्यान दोन जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला आहे. गेल्या २० दिवसांच्या कालखंडात एक अंकावर असलेला कोरोना बाधितांचा आकडा ३०० च्या आसपास गेला मात्र कालपासून पुन्हा हा आकडा २०० च्या आसपास दिसून येत आहे.बीड जिल्ह्यात एकूण कालपर्यंत १ हजार ५४७ रुग्ण ऍक्टिव्ह असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यामध्ये १ हजार ४२६ रुग्ण हे घरीच आयसोलेशन होत उपचार घेत आहेत.१२१ रुग्ण हे जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून बीड जिल्हा रुग्णालयात केवळ १० रुग्ण उपचार घेत आहेत. यातील एकाही रुग्णाला अद्याप पावेत व्हेंटीलेटरची गरज भासलेली नाही.तिकडे अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये एकूण ३ वॉर्डात १५ बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ४ सिझर झालेल्या महिलांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here