



✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालुका प्रतिनिधी)
आष्टी(दि.25जानेवारी):- येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक किरण गोंधळी यांनी आष्टी ग्रा.प.अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या वाचनालयाला एमपीएससी परीक्षेची २५ हजार रुपयांची पुस्तके भेट दिली . चामोर्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एम.मुरुंगानंथम (भाप्रसे ), पशुधन विकास अधिकारी सागर डुकरे यांनी आष्टी येथील वाचनालयाला भेट दिली. यावेळी त्यांना एमपीएससी पुस्तके भेट देण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना एम.मुरुगानंथम म्हणाले विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करावी त्यासाठी चिद्द व चिकाटी ठेवा, अभ्यासात सातत्य ठेवावे.यश नक्कीच मिळेल .ही एमपीएससी ची पुस्तके तुम्हाला नक्कीच उपयोगात पडेल. याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. या प्रसंगी आष्टी च्या सरपंच बेबी बुरांडे , उपसरपंच सत्यशील डोर्लीकर , ग्रा.प.सदस्य राकेश बेलसरे , कपिल पाल , छोटू दुर्गे , संतोष बारापात्रे , विशाखा गोंधळी व सचिव अनिल पंधरे उपस्थित होते


