Home महाराष्ट्र गेवराईतील बाजारात तीळ, मटकीला वाढीव दर..!

गेवराईतील बाजारात तीळ, मटकीला वाढीव दर..!

201

🔹पहा काय आहे वाढीव दर

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई,जि.बीड(दि.25जानेवारी):- गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात मटकी, तिळाची आवक नगण्यच राहिली. त्यामुळे त्यांना वाढीव दर मिळाले. दुसरीकडे उडदाची एकवेळ, तर हरभऱ्याची केवळ दोन वेळाच आवक झाली. मात्र, या दोन्हीचे दर कमीच होते.

गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १७ ते २२ जानेवारी दरम्यान मटकीची दोन वेळा मिळून २ क्‍विंटल आवक झाली. तिला एकवेळा ८ हजार रुपये, तर दुसऱ्या वेळी १०६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तिळाचीही केवळ एक वेळा एक क्‍विंटल आवक झाली. या तिळाचे दर ९ हजार रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. उडदाची आवक एकवेळा एक क्‍विंटल झाली. त्यास ४ हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. हरभऱ्याची दोन वेळा मिळून २ क्‍विंटल आवक झाली. त्यास एकवेळ ३००० रुपये, तर दुसऱ्या वेळी ३६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

बाजरीची एकूण आवक २६१ क्‍विंटल झाली. २६ ते ७२ क्‍विंटल आवक झालेल्या बाजरीला सरासरी १७५० ते २१ रुपये दर मिळाला. मुगाची चार वेळा मिळून १३ क्‍विंटल आवक झाली. त्यास सरासरी ५००० ते ५८५० रुपये दर मिळाला. लाल, पांढऱ्या व काळ्या तुरीपैकी पांढऱ्या तुरीची सर्वाधिक १५३५ क्‍विंटल आवक झाली. या तुरीचे सरासरी दर ५७५० ते ५८५० रुपये राहिले. काळ्या तुरीची एकूण ३४० क्‍विंटल आवक होऊन सरासरी ५५०१ ते ५८५० रुपये, लाल तुरीची एक क्‍विंटल आवक होऊन ५८०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला.

सोयाबीनला ५७०० ते ५८०० रुपये

ज्वारीची आवक ३८८ क्‍विंटल झाली. ४३ ते १०० क्‍विंटल आवक झालेल्या ज्वारीला सरासरी १६०० ते १८५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. सोयाबीनची एकूण आवक ४०० क्‍विंटल झाली. ४० ते १११ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला सरासरी ५७०० ते ५८०० रुपये दर मिळाला. गव्हाची एकूण आवक ५४४ क्‍विंटल झाली. ५५ ते १२१ क्‍विंटल आवक झालेल्या गव्हाला सरासरी १८५० ते २१०० रुपये दर मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here