



✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख)
तलवाडा(दि.25जानेवारी):- येथील लाँड्री चालक बंटी भांबरे यांच्या कडे राजापूर येथील दगडू जाधव यांनी रविवारी इस्त्री साठी कपडे आणून ठेवले ते कपडे सोमवारी इस्त्रीसाठी काढले असता त्यामध्ये सोन्याची तब्बल एक तोळ्यांची पोत यामध्ये डोरले,मनी, असा एकूण चाळीस ते पंचेचाळीस हजाराच्या किमतीची सोन्याची पोत आढळून आली.
बंटी भांबरे यांनी लगेच ज्यांनी कपडे आणले त्यांना कल्पना दिली व सोमवारी सकाळी तलवाडा येथील आपल्या लाँड्री दुकानात दगडू जाधव यांना बोलावून सोन्याची पोत परत केली.त्याच्या या प्रामाणिक पणामुळे त्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी शिवसेनेचे गट नेते गोविंद दादा जोशी,पत्रकार तुळशीराम वाघमारे,राहुल डोंगरे,राजापूर येथील ग्रामपंचायत सदस्य अनिल लहाने,रमेशतात्त्या थोरात व सहकारी उपस्थित होते.


