Home महाराष्ट्र रक्तदान करून साकिब शाह यांनी केली उपोषणाला सुरुवात!

रक्तदान करून साकिब शाह यांनी केली उपोषणाला सुरुवात!

50

🔸उपजिल्हा रुग्णालय पुसद च्या असुविधा असल्याने रक्तदानाने सुरुवात

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.25जानेवारी):-विधानसभा क्षेत्रातील गोरगरिबांचे जीवन वाचविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय पुसदचे स्थापने सोबतच उपलब्ध सुविधा, साधन- संसाधन असतानाही केवळ बेजबाबदार अधिकारी, डॉक्टर-कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे लोकांच्या जीवाशी खेळ करणा-याना जागे करण्यासाठी रक्तदान करून माजी नगरसेवक साकिब शाह यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे उपलब्ध असलेले नवजात शिशू अतिदक्षता विभाग सुरू करण्यात यावे. रक्त साठवणूक केंद्र उपलब्ध असून बंद अवस्थेत आहे ते सुरू करून लोकांचे जीव वाचवण्यासाठी मदत करावी. मोबाईल एक्स-रे मशीन बंद अवस्थेत धूळखात पडली असल्याने अनेकांना खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे. ती मशीन ताबडतोब सुरू करून गरीब रुग्णांना लाभ द्यावा. सरकारी दवाखान्यातील डॉक्टर व स्टाप मोबाईल वरच ड्युटी करीत असल्याने अनेकांना खाजगी तथा यवतमाळ येथे रेफर करण्याचा सल्ला दिला जातो त्या वेळ तात्काळ कारवाई करून रुग्णसेवेसाठी डॉक्टर तथा स्टाफ यांना सतर्क ठेवण्याबाबत ची उपाययोजना करावी. मुबलक औषध साठा उपलब्ध ठेवावा व त्याचा लाभ रुग्णांना देण्यात यावा खाजगी मेडिकलमध्ये पाठवण्याचा सल्ला देऊ नये.

उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी मोफत असलेल्या सेवांचा सुद्धा रुग्णांकडून पैशाची मागणी करून आर्थिक लूट थांबविण्यात यावी. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णसेवेत अडथळा निर्माण होऊन अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत याबाबत उपाययोजना करुन पुसद विधानसभा क्षेत्रातील गोरगरीब रूग्णांचे जीव वाचण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागील आठवड्यात माजी नगरसेवक साकिब शहा यांनी तक्रारीत द्वारे दखल घेण्याची विनंती केली होती. व सदर मागणीची दखल न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपविभागीय अधिकारी पुसद, जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने अखेर माजी नगरसेवक साकिब शाहा यांनी २४ जानेवारी २०२२ पासून उपजिल्हा रुग्णालयाचे गेट समोर उपोषणास सुरुवात केली आहे.

रुग्णसेवेसाठी गोरगरिबांचे जीवन वाचविण्यासाठी असलेल्या या उपोषणाची सुरुवात उपोषण करते साकिब शाहा यांनी स्वतः रक्तदान करून सुरुवात केली.यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, बिरसा मुंडा ब्रिगेडचे अध्यक्ष मारोती भस्मे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय गडम व पुंडलिक शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नानाभाऊ बेले, रुग्णमित्र फाउंडेशन शांतीसागर इंगोले, रक्त संजीवनी ग्रुप ऋषिकेश तनमने, सेवानिवृत्त बँक अधिकारी नारायण जाधव, बीएसएफ चे सैनिक सुभाष यादव, विठ्ठल डाखोरे, गुरु उचाडे ,बाबुभाई अब्दुल सत्तार, शेख नजीर, यावेळी उपस्थित होते.

Previous articleकम्युनिस्ट पक्षाचा पाथर्डी फाट्यावर नाशिक मनपा निवडणूक 2022 संदर्भात मेळावा संपन्न
Next articleप्रजासत्ताकदिन :आम्ही भारताचे लोक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here