Home महाराष्ट्र कोविड काळात वैद्यकीय पदांवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना न्याय मिवळून देण्याचे जिल्हा...

कोविड काळात वैद्यकीय पदांवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना न्याय मिवळून देण्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आश्वासन

50

🔹एक आठवड्याच्या आत मानधन न मिळाल्यास जिल्हा काँग्रेस च्या वतीने आंदोलन करण्याचा महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा इशारा

🔸थकीत मानधन व पुनर्नियुक्ती ऑर्डर मिळूवून देण्याकरिता महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या कडे कोविड योध्यांची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.24जानेवारी):- थकीत मानधन लवकरात लवकर मिळवून देण्याकरिता, शुभम मेश्राम यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या कडे मागणी केली. कोविड काळात यापैकी अनेकांनी मायक्रोबायोलाजिस्ट, टेकनिशीअन, असिस्टंट, अटेंडेंट, वॉर्ड बॉय म्हणून या योध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या परीने सर्वोतोपरी प्रयत्न करून कोविड रुग्णालयात सेवा दिली. परंतु मागील सहा महिन्यांपासून यांना मानधन मिळाले नसून माहे जानेवारी ते जुलै २०२२ चे पुनर्नियुक्ती आर्डर सुधा अद्याप मिळालेले नाही.

यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब गडचिरोली यांच्या कडे वारंवार पत्र व्यवहार केले असता अद्यापही यावर कार्यवाही झालेली नाही असे उपस्थित शिष्ट मंडळाने सांगितले असून, कोविड योध्यांचा सन्मान करणे हे आमचे पहिले कर्तव्य असून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याकरिता शासन दरबाबरी सर्वोतपरी प्रयत्न करणार व लवकरात लवकर थकीत मानधन मिळवून देणार असे आश्वासन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिले. यावेळी शुभम मेश्राम, मृणाली लोयबरे, करिष्मा हर्षे, स्नेहा भजभुजे , पल्लवी दहागावकर, पल्लवी वासेकर, पूनम आत्राम, किरण कुते, पायल राहुलकर, अस्मिता डोंगे, पायल कोडापे, योगिता कोटरंगे, भाग्यश्री मेश्राम, प्रफुल राउत, अंकुश डोंगरे, दीक्षा दर्डे, प्रफुल राउत, चांदणी गेडाम, प्रीती सरकार, आशिष कुनघाडकर, आशिष कुकडे, अविनाश गव्हारे, विठल सोनटक्के, सुरज रामटेके सह अनेक कंत्राटी कामगार यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here