Home महाराष्ट्र येवला महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सरचिटणीस पदी हितेश दाभाडे यांची बिनविरोध निवड

येवला महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सरचिटणीस पदी हितेश दाभाडे यांची बिनविरोध निवड

237

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.24जानेवारी):-महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत नाशिक जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्या वेळी गजानन देशमुख, यांना पुन्हा येवला तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

तसेच गजानन देशमुख यांच्या हस्ते येवला तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली, त्यात तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख पाटोदा,कार्याध्यक्ष प्रविण पहीलवान,सरचिटणीस हितेश दाभाडे, खजिनदार सचिन वखारे,संघटक बाबासाहेब शिंदे,सहसंघटक शकील शेख,कोषाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे,समन्यक सय्यद कौसर,प्रसिद्धी प्रमुख दिपक सोनवणे,यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन बैरागी,जिल्हाकार्याध्यक्ष अय्युब शाह,जिल्हा खजिनदार सचिन शिंदे,जिल्हा कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट साजीत शेख यांची प्रमुख उपस्थिती होती, त्या वेळी जेष्ठ पत्रकार योगेंद्र वाघ,यांना सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना योग्य मार्गदर्शन केले. त्या वेळी,राम कदम, संतोष गायकवाड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here