



🔸दत्ता वाकसे यांनी जलसंपदा मंत्र्यांना दिले पत्र
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114
बीड(दि.24जानेवारी):-आद्यक्रांतीवीर राजे नौवसाजी नाईक यांच्या स्मरणार्थ ईसापूर धरणास त्यांचे नामकरण करण्याची मागणी शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. मराठवाडा व विदर्भामध्ये नाव्हा (जि. नांदेड) येथील आद्यक्रांतीवीर राजे नौवसाजी नाईक व त्यांचे १५०० साथीदारांनी इंग्रज व निजामाच्या सशस्त्र सहा हजार सैन्या सोबत ८ जानेवारी १८१९ ते ३१ जानेवारी १८१९ या कालखंडामध्ये स्वतंत्र मिळविण्यासाठी रक्तरंजीत लढाई केली. यामध्ये राजे नौवसाजी नाईक व इतर सहाशे साथीदारांना वीरमरण आले.
भारतीय स्वातंत्र्याचा संपूर्ण |देशात अमृत महोत्सव साजरा करत असताना नाव्हा येथील आद्यक्रांतीवीर राजे नौवसाजी नाईक व त्यांच्या साथीदारांनी इंग्रज व निजाम सैन्या विरूद्ध केलेल्या सशस्त्र लढाईला ३१ जानेवारी रोजी २०३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ इसापूर धरण ता. पुसद जि. यवतमाळ येथे आद्यक्रांतीवीर राजे नौवसाजी नाईक यांचे नाव ३१ जानेवारी रोजी देण्याची मागणी शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.





