



🔸भीम आर्मी ची मा.मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी.!
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.24जानेवारी):-भिमाकोरेगाव या ठिकाणी 500 विरुद्ध 28 हजार लढाई ही जाती अंताची लढाई होती.परंतु मालवदकर या मनुवादी औलादिनी ‘वास्तव’ हे खोटा इतिहास सांगणारे पुस्तक लिहिले आहे.ह्या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने तात्काळ बंदी आणावी.त्या पुस्तकाचे लेखक माळवदकर या मनुवादी विचारसरणी च्या लेखकावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात यावी.ब्राम्हण महासंघाने हे पुस्तकं फुकट वाटू अशी भूमिका मांडली आहे. याचा ही आम्ही निषेध करतो.महाराष्ट्रात दंगली घडविण्याच्या दिशेने यांचे कृत्य दिसत आहे, म्हणून ब्राम्हण महासंघ या संघटनेवर ही तात्काळ बंदी आणावी अशी मुख्यमंत्री यांना आम्ही मागणी करत आहोत.
खोटा इतिहास सांगणारे ‘वास्तव’ पुस्तक ज्या दुकानात,जितेही भेटेल तिथे आंबेडकरवादी कार्यकर्ता हे पुस्तकं जाळल्या शिवाय राहणार नाही.व पुढे उदभवलेल्या परिस्थितीला महाराष्ट्र शासन जबाबदार असेल.अश्या आशयाचे निवेदन मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत मा.उध्दवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना देण्यात आले.यावेळी निवेदन देतेवेळेस अशोक भालेराव जिल्हाध्यक्ष भीम आर्मी, श्याम देवकुळे जिल्हा उपाध्यक्ष, धनराज कांबळे जिल्हा मुख्य महासचिव,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खिलारे,अजय लोखंडे पुसद तालुका उपाध्यक्ष,रुषाल बारमाटे तालुका संघटक ,जय ससाणे,शेख फरहान,सिद्धभान कांबळे,जयभीम लोखंडे, रजनीकांत लोखंडे,पंकज चंदनशिवे,आकाश खंदारे,अजय सरदार,मिलिंद पठाडे इत्यादी कार्येकर्ते उपस्थित होते.
प्रतिलिपी-
मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य
मा.गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य
मा.सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य
मा.सचिव साहेब सामाजिक न्याय विभाग


