




🔹जिल्हाप्रशासनाच्या निषेधार्थ मोफत भाजीपाला वाटप :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114
बीड(दि.24जानेवारी):-दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार भरवण्यास बंदी करण्यात आली आहे त्यामुळे ग्रामिण भागातील अर्थचक्र कोलमडले असुन शेतकरी तसेच छोटे व्यापारी आर्थिक संकटात सापडले असुन सामान्यांना परवडणा-या किंमतीच्या वस्तुंची खरेदी करता येऊन विक्रेत्यांचीही उपजिविका भागते.आठवडे बाजारात भाजीपाला, धान्य, कापडे, जनावरे आदिंची खरेदीविक्री होत असून लाखोरूपयांची उलाढाल होत असते.
याचवेळी शासनाने प्रार्थनास्थळे,शहरी बाजारपेठा, तसेच राजकीय पक्षांच्या निवडणुका, सभा, मोठमोठ्या बैठका,मेळावे होत असताना जिल्हाप्रशासन मुग गिळुन गप्प असुन बघ्याची भुमिका घेत आहे तसेच दि.२४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा शिक्षणमंत्री यांनी केली आहे, त्यामुळेच जिल्हाप्रशासनाने अटी व नियमांसह आठवडे बाजारास परवानगी देण्यात यावी याचवेळी दि.१९ जानेवारी २०२२ बुधवार रोजी माजलगाव येथील नगरपालिकेने भरलेला आठवडी बाजार उठवल्यामुळे शेतक-यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकुन देण्यात आला त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
त्यामुळेच संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आदि मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक आठवडी बाजार भरविण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, कृषिमंत्री,विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले.. आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर ,सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, उपाध्यक्ष मराठवाडा उपाध्यक्ष आल इंडीया पॅथर सेना नितिन सोनावणे,मुक्त पत्रकार तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम एस युसुफ , डाॅ.संजय तांदळे, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन आदि सहभागी होते.




