Home महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे ‘ नेताजी सुभाषचंद्र बोस...

सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे ‘ नेताजी सुभाषचंद्र बोस ‘ व ‘ बाळासाहेब ठाकरे ‘ जयंती उत्साहात साजरी

265

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.२३जानेवारी):- रविवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे ” नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे ” यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन. कोळी यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे.एस.पवार व मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे उपशिक्षक हेमंत माळी यांनी ‘ तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा ‘ या घोषवाक्याचे जनक – आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यानंतर व्ही.टी.माळी यांनी शिवसेना पक्ष प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनसंघर्ष उलगडला.

याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे.एस.पवार, जेष्ठ शिक्षीका एम.के.कापडणे, एम.बी.मोरे , एस.व्ही. आढावे, एस.एन.कोळी, पी.डी.पाटील, हेमंत माळी, व्ही.टी.माळी, सी.एम.भोळे, श्रीमती व्ही.पी.वऱ्हाडे, श्रीमती. एम.जे.महाजन, लिपीक जे.एस.महाजन, पी.डी.बडगुजर , ग्रंथपाल गोपाल महाजन, जीवन भोई, अशोक पाटील, उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन. कोळी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख एम.बी.मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक बंधु – भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

Previous articleगडचिरोली:- सहा नगरपंचायतीत त्रिशंकु स्थिती राजकीय पक्षांचे नेते सत्ता समीकरणासाठी आकड्यांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त
Next articleभावमधुर काव्य रचनेचे नवे व्यासपीठ – मधुसिंधू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here