Home महाराष्ट्र गडचिरोली:- सहा नगरपंचायतीत त्रिशंकु स्थिती राजकीय पक्षांचे नेते सत्ता समीकरणासाठी आकड्यांची गोळाबेरीज...

गडचिरोली:- सहा नगरपंचायतीत त्रिशंकु स्थिती राजकीय पक्षांचे नेते सत्ता समीकरणासाठी आकड्यांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त

137

🔸सिरोचा नगर पंचायतीवर आदिवासी विद्यार्थी संघटनेचे वर्चस्व कूरखेडा नगर पंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालुका प्रतिनिधी)

चामोर्शी(दि. २२जानेवारी):-गडचिरोली जिल्ह्यात नऊ नगरपंचायतीचे निकाल गुरवारला जाहिर झाले असून सात नगरपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे वर्ष २०१६ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत सहा नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता होती राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन नंबरवर कब्जा होता तर कांग्रेसने एका नगरपंचायतवर सत्ता काबीज केली होती मात्र या निवडणूकीत भाजपला नऊ नगरपंचायत पैकी केवळ कुरखेडा नगरपंचायतीमध्ये एकहाती सत्ता मिळवता आली असुन उर्वरीत नगरपंचायतीमध्ये अन्य पक्षानी मुसंडी मारली आहे या सत्ता परिवर्तनामुळे नविन राजकिय समीकरण उदयास येण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील बारा तालुक्यापैकी गडचिरोली, देसाईगंज,आरमोरी,या तिन ठिकाणी नगरपरिषद असुन उर्वरीत नऊ ठिकाणी नगरपंचायत अस्तीत्वात आहेत नगरपंचायतीमध्ये कोरची,कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भामरागड, व सिरोंचा यांचा समावेश आहे या नऊ नगरपंचायतची निवडणूक ओबिसी आरक्षणाच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन टप्यात पार पडली गुरवारला सर्व नगरपंचायतीचे निकाल घोषीत करण्यात आले यामध्ये भाजपाने कुरखेडा नगरपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापीत केली कांग्रेसने धानोरा नगरपंचायतीवर आपला झेंडा रोवला सिरोंचा नगरपंचायतीवर आदिवासी विध्यार्थी संघटनेने बहुमत प्राप्त केले आहे उर्वरीत सहा नगरपंचायतवर सर्वच पक्षांना संमिश्र यश मिळाले असुन नगराध्यक्षाचे आरक्षण जाहिर झाल्यानंतर सत्तेचे चित्र सपष्ट होणार आहे सध्या सर्वच राजकिय पक्षांचे नेते सत्ता समीकरणासाठी आकड्यांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त आहेत

Previous articleघुग्घुस भाजपाच्या उपोषणापुढे नगर परिषद प्रशासन नमले
Next articleसुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे ‘ नेताजी सुभाषचंद्र बोस ‘ व ‘ बाळासाहेब ठाकरे ‘ जयंती उत्साहात साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here