Home महाराष्ट्र घुग्घुस भाजपाच्या उपोषणापुढे नगर परिषद प्रशासन नमले

घुग्घुस भाजपाच्या उपोषणापुढे नगर परिषद प्रशासन नमले

138

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

🔸तब्बल 01 कोटी 40 लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर

घुग्घुस(दि.23जानेवारी):- दलित वस्ती सुधार योजनेतून वार्ड क्र. 4 व 5 ला सरसकट वगळल्यामुळे रविवार 16 जानेवारी पासून घुग्घुस येथील बस स्थानक समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घुग्घुस भाजपातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. या उपोषणाला शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, माजी सरपंच संतोष नूने, माजी तंमुस अध्यक्ष मल्लेश बल्ला, पूजा दुर्गम, भाजपाचे विक्की सारसर, मूर्ती पेरकुल्ला, चंद्रकांत पालावार यांच्यासोबत वार्ड वासियांनी उपोषण सुरु केले.

सलग आठ दिवस चाललेल्या उपोषणात शेकडो कार्यकर्ते रोज उपोषण स्थळी उपस्थित राहत होते.

24 डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे नगर परिषद मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना घुग्घुस नगर परिषदेने घुग्घुस दलित वस्ती सुधार योजनेतून वार्ड क्र. 4 व वार्ड क्र. 5 व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरला सरसकट वगळल्यामुळे वार्डातील सिमेंट रस्ते व अंडरग्राउंड नाली बांधकामासाठी 3.5 करोड रुपयांमधील निधी उपलब्ध होऊ शकला नाही. या वार्डातील सर्व दलित बांधवांवर हेतूपुरस्पर अन्याय करण्यात आला आहे. वार्ड क्र. 04 व 05 ला विकास निधी द्या व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा उपोषण करू असा इशारा देण्यात आला होता.परंतु मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे उपोषण सुरू करण्यात आले होते.

मुख्याधिकारी अर्शीया जुही व सहा. पो. नि. संजय सिंग यांनी उपोषण स्थळी भेट दिली. मुख्याधिकारी यांनी लेखी स्वरुपात मागण्या मान्य झाल्याचे पत्र दिले. पत्रात वार्ड क्रमांक 4 व 5 ला 1 कोटी 40 लाख रुपयाचा निधी विविध विकासकामांसाठी देण्यात आला आहे. दिलेली कामे तातडीने मंजूर करण्यात आली आहेत, तसेच दोषी अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी अर्शिया जुई यांनी उपोषणकर्त्यांना निंबु पाणी देऊन उपोषणाची सांगता केली.यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी उपसरपंच संजय तिवारी माजी माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे पूनम शंकर, विनोद चौधरी, साजन गोहने, पूजा दुर्गम, सुचिता लुटे, वैशाली ढवस, मल्लेश बल्ला, विक्की सारसर, गुरूदास तग्रपवार, रवी बडगुल, शरद गेडाम, सोनू सारसर, बबलू सातपुते, दीपक मिसाला, शाम आगदारी, श्रीकांत सावे, सोनू सारसर, गणेश मोहुर्ले, रामस्वामी कोंडावार, हनीफ शेख, हसन शेख, मंदेश्वर पेंदोर, खालील अहमद, सरिता इसारप, सुनील राम, सुभाष यार्दी, महेश भेले, सुंदर गोस्की, समन्ना कटकम, चंदू पालावार, पिंटू मंडल, मूर्ती पेरपुल्ला, गीता गंगोई, अंजली नैताम, फुलनबाई मेश्राम, शालू डे, साधना नन्नावरे, मुस्कान मडावी, सरस्वती निषाद, तिरुमाला गायकवाड, मेघशाम बंसारी, अरुण दामेर, श्रीनिवास येरला, श्रीकांत गुंडेटी, तिरुपती शेंगारप उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here