



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.23जानेवारी):-मुख्यमंत्री ग्रामसडक योजना परभणी अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील प्ररामा १६ ते पडेगाव किमी ०/५०० ते २/३०० या १.८०० किमी या रस्त्याच्या ९७.८८ लक्ष रुपये कामाची सुधारणा करण्याचा भूमिपूजन सोहळा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते आज दि.२३ जानेवारी रोजी संपन्न झाला.मोजे पडेगाव येथील नागरिकांची रस्ता अभावी गेल्या अनेक दिवसांपासून हेळसांड होत होती.या रस्त्याच्या कामाची सुधारणा करण्याचे काम बर्याच वर्षापासून प्रलंबित होती.
आमदार गुट्टे यांच्या सततच्या प्रयत्नाने या रस्त्याच्या सुधारणा करण्यासाठी मंजूर झाला त्यामुळे या परिसरातील सामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.या प्रसंगी सभापती बालासाहेब निरस जि.प. सदस्य किशनराव भोसले, ज्ञानोबा (माऊली) जाधव, डॉ.कारभारी निरस, नामदेवराव निरस, रामप्रभूजी निरस, सचिन निरस, विजय निरस, श्रीराम मुंडे,यांच्यासह मौजे पडेगाव येथील प्रतिष्ठित मंडळी व नागरिक उपस्थित होते.


